उजनी धरण हाऊसफुल …!

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

गेल्या काही दिवसात उजनी धरणक्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे पुणे, सोलापूर ,अहमदनगर जिल्ह्यासहित मराठवाड्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले असून या धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92b89e0d-a9fe-11e8-a8b0-8b7b663dc472′]

उजनी धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा झाला असून ४२ दरवाजांपैकी सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्वाधिक पाणीसाठा असलेले हे धरण आहे . गेल्या ३८ वर्षात ३० वेळा धरण १०० टक्के भरले आहे. तर पावसामुळे पुणे जिल्‍ह्यातील सर्व धरणे भरली असून उजनीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. दौंडमधून ३९ हजार ९८१ क्युसेकची आवक सुरू आहे.
दीपक मानकर यांना कारागृहात मिळणार घरचे जेवण आणि औषधे 

उजनीने शंभरी पार केल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील उद्योगधंदे, कारखानदार व शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भीमा, नीरा खोर्‍यात पाऊस सुरुच असून नदी पात्रातील पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1b745fc-a9fe-11e8-8507-e9d7d9938048′]

मृतसाठ्यात सर्वात मोठे धरण

उजनी धरणाच्या परिक्षेत्रात ५०० मिमी पाऊस व भीमा नदी उगम परिसरातील १९ धरणे व त्यावरील ४ हजार ३२० मिमी पावसाच्या अवलंबतेवर उजनीचे जलसंपदा क्षेत्र निर्माण केले आहे. उजनी धरण हे महाराष्ट्रातील उपयुक्त साठ्याबाबत जायकवाडी व कोयना धरणानंतर सर्वात मोठे धरण असून, मृतसाठ्यात मात्र महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ३ हजार ३२० दलघमी (१२३ टीएमसी), तर उपयुक्त पाणी साठवण क्षमता १५१७. १९द.ल.घ.मी. व मृतपाणीसाठवण क्षमता १८०२. ८१द.ल.घ.मी. उपयुक्त पाणी साठ्यापेक्षा (५३. ५७ टीएमसी) मृतसाठा(६३. ६५ टीएमसी) मोठा असलेले उजनी हे महाराष्ट्रातील एकमेव धरण आहे.
पेट्रोल – डिझेलच्या दरात विक्रमी वाढ 

या धरणाचे पाणलोट क्षेत्र हे १४८५६ चौ.कि.मी. असून या धरणाखाली २९०००हेक्टर क्षेत्र, ५१ गावे (पुणे-२५, सोलापूर-२३, तर अहमदनगर- ३) बुडाली आहेत.