खुशखबर ! उजनी धरण आज 100 % भरण्याची शक्यता

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पावसामुळे उजनी धरण 98 टक्के भरले असून शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दौंडकडून 23 हजार क्यूसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत असल्यामुळे धरण आज 100 टक्के भरण्याची शक्यता आहे.

उजनी धरणासह पुणे परिसरात होत असणार्‍या पावसामुळे वेगाने भरले आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे भरली असल्यामुळे संबंधित धरणातील सोडलेले पाणी उजनी धरणात येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणी साठ्यात अजून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास वरदायिनी असलेले उजनी धरण मायनसमध्ये गेले होते. आता ते 100 टक्के भरत असल्याने शेतकरी खुश झाला आहे.

पुणे जिल्ह्यात व भीमा खोर्‍यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत जोरदार वाढ झाली आहे. सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास कृषी विकासाला हातभार लागलेल्या उजनी धरणाच्या पाणी साठ्याकडे नेहमीच शेतकर्‍यांचे लक्ष लागलेले असते. या उन्हाळ्यात उजनी धरण मायनसमध्ये गेले होते तर जून 2020 मध्ये सर्वात निचांकी म्हणजेच मायनस – 24.15 टक्क्यांपर्यंत गेलेल्या धरणात पुणे जिल्ह्यातून व भीमा खोर्‍यात पडलेल्या पावसाचे पाणी आल्याने पाणी पातळी वाढली होती.