भाजप कार्यकर्त्याशी ‘अश्‍लील’ चॅटिंग केल्याप्रकरणी प्रदीप जोशी निलंबीत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील भाजपच्या संघटन मंत्र्यांचे एका युवकाबरोबरील अश्लील संभाषण आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या संघटन मंत्र्यांची सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आली असून राज्यातील विधानसभेत देखील या प्रकरणी गदारोळ उडाला.

मध्यप्रदेशच्या उज्जैनमधील संघटन मंत्री प्रदीप जोशी यांचे हे प्रकरण पुढे आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांचे एका युवकाबरोबरील अश्लील संभाषण आणि व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष राकेश सिंह यांनी त्यांची या पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर विधानसभेत देखील सरकारमधील मंत्री जयवर्धन सिंह यांनी टोला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी हे संभाषण लीक झाल्यानंतर पक्षाच्या नेत्यांमध्ये याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. मात्र हे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पक्षाची बदनामी झाली. यामुळे तात्काळ कारवाई करत पक्षाने त्यांची या पदावरून हकालपट्टी केली. हे प्रकरण झाल्यानंतर आता इंदूरमधील हाईराइज बिल्डिंग चर्चेत आली आहे. याच बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये हे मंत्री सतत राहत असल्याचे समोर आले आहे. उज्जैन दक्षिण विधानसभा मधील एका मोठ्या नेत्याचा हा फ्लॅट असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, हि घटना समोर आल्यानंतर पक्षाने या बिल्डिंगच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपासणी केली असता या फ्लॅटमध्ये अनेक तरुणांची सतत येजा सुरु असल्याचे दिसून आले.

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?