Ujjwal Nikam Reaction On Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाळ कोणाचे? उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान

Ujjwal Nikam Reaction On Maharashtra Political Crisis

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ujjwal Nikam Reaction On Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह (Shiv Sena Name And Symbol) याबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाच्या (EC India) विरोधात ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर आजच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या दोन महत्त्वाच्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत असल्याने याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच आज न्यायालयात काय घडू शकतं यासंदर्भात ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे. या विषयात सुप्रीम कोर्टात आज काय निर्णय घेतला जाईल हे आताच सांगणं कठीण असल्याचे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. (Ujjwal Nikam Reaction On Maharashtra Political Crisis)

पक्षाची घटना तपासली जाईल

उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, सत्तासंघर्षाबाबत निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेच्या आधारे निर्णय दिला आहे. शिवसेना ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे कायमस्वरुपी संस्थापक राहतील अशी घटना होती. परंतु आयोगाने त्यांना लोकशाहीमध्ये कोणतेही पद हे तहहयात राहू शकत नाही, असं म्हटलं होतं. पुढे त्यांना निवडणूक करुन अध्यक्ष केले होते. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रामुख्याने पक्षाची घटना तपासली जाईल. त्यामध्ये पक्षाच्या चिन्हावर किती निवडून आले आहेत, ते कोणाच्या बाजूने आहेत ते तपासण्यात येईल. निवडणूक आयोगाचा शिवसेनेबाबत जो निर्णय आहे तो घटनेच्या आधारे आहे का हे तपासले जाईल आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल. परंतु तो निर्णय काय असेल हे आत्ताच सांगणं कठीण आहे. (Ujjwal Nikam Reaction On Maharashtra Political Crisis)

दोन प्रकरणांवर सुनावणी

शिवसेनेच्या दोन मोठ्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याप्रकरणी ही सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. त्याविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर विधानसभा अध्यक्ष यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. आमदारांच्या निलंबनासंदर्भात अध्यक्षांना तातडीने निर्णय देण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती ठाकरे गटाने याचिकेतून केली आहे. सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पारडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी होणार आहे. दोन्ही याचिकांचे क्रमांक अनुक्रमे 18 व 19 आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय होणार, कोर्ट काही निर्देश देते का याची उत्सुकता लागली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Public Meeting In Pune | अजित पवारांच्या पुण्यातील रोड-शो नंतर शरद पवारांची जाहीर सभा

Pune News | पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष पदी राज मुजावर यांची नियुक्ती

पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ! 18 उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस आणि 18 चिटणीस

Total
0
Shares
Related Posts