फायद्याची गोष्ट ! ‘फ्री’मध्ये LPG सिलेंडर देतंय मोदी सरकार, ‘लाभ’ घेण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणू विरूद्ध युद्धात केंद्र सरकारने देशभरात 21 दिवस लॉकडाउन लागू केले आहे. या दरम्यान गरीब वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकारने 1.7 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. या मदत पॅकेजचा एक भाग म्हणजे उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकार मोफत एलपीजी सिलेंडर पुरवेल. सरकारच्या या योजनेचा लाभ केवळ या योजनेंतर्गत नोंदणीकृत असलेल्या लोकांनाच मिळणार आहे.

लाभार्थीचा मोबाइल क्रमांक नोंदणीकृत असणे बंधनकारक

एलपीजी सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकाचा मोबाइल क्रमांक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या लाभार्थ्यांचा मोबाइल नंबर गॅस एजन्सीकडे नोंदणीकृत आहे, केवळ त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी सरकारने संपूर्ण तयारीनंतर सिलेंडरचा पुरवठादेखील सुरू केला आहे. यासाठी सिलेंडरची रक्कम प्रथम लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाईल. यानंतर, तो गॅस बुक करेल आणि रोकड भरेल आणि सिलिंडर घेईल.

एका महिन्यात मिळणार 3 सिलेंडर

उज्ज्वला योजनेंतर्गत 14.2 किलोग्रॅमचे 3 एलपीजी सिलेंडर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत देण्यात येणार आहेत. 1 महिन्यात फक्त एक सिलिंडर विनामूल्य दिले जाईल. ज्यांच्याकडे 5 किलोग्रॅमची क्षमता असणारे सिलेंडर आहेत त्यांना 3 महिन्यांत एकूण 8 सिलेंडर दिले जातील. म्हणजेच एका महिन्यात जास्तीत जास्त 3 सिलेंडर विनामूल्य दिले जातील.

विना अनुदानित सिलेंडरची किंमत झाली कमी

अलीकडेच सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कमी केली आहे. दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या विना सबसिडी सिलेंडरची किंमत आता 744 रुपयांवर आली आहे. यापूर्वी दिल्लीत एक सिलेंडर 805.50 रुपयांना मिळत होते. अशा प्रकारे 14.2 किलोग्रॅमच्या एका सिलेंडरची किंमत सुमारे 61.50 रुपयांनी कमी झाली आहे.