मुंबई : 26/11 च्या हल्ल्यात मिळाली 10 बनावट ‘आयडी कार्ड’, सगळ्यावर लिहीली होती हिंदू नावे (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचे प्रकरण न्यायालयात लढवणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे की, 26/11 मुंबई हल्ला प्रकरणात आम्ही न्यायालयासमोर 10 आयडी कार्ड सादर केले होते जे बनावट होते. त्यापैकी एक कसाबचे आणि 9 अन्य आरोपींचे कार्ड होते. हे खरे आहे की या आयडी कार्डवर हिंदू नावे लिहिलेली होती.

उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, 19.02.08 ला कसाबने मुंबईच्या न्यायालयात जबाब दिला, ज्यामध्ये हे उघड झाले की, 10 आरोपींकडे 10 बनावट आयडी कार्ड होते. कसाबने म्हटले होते की, काफा, ज्याने त्याला लष्करी प्रशिक्षण दिले होते, त्याने सांगितले होते की, त्यांना 10 बनावट आयडी कार्ड देण्यात येतील. कसाबने म्हटले होते की, बनावट कार्डचा वापर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी केला गेला आणि मी ते सिद्ध करून दाखवले.

मुंबई हल्ल्यात 10 दहशतवाद्यांपैकी 9 जणांना ठार करण्यात आले आणि कसाबला जिंवत पकडण्यात आले. दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणे भारतासाठी खुप महत्वाचे ठरले, ज्याने अनेक खळबळजनक खुलासे केले. हल्ल्यानंतर पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबावर संशय व्यक्त करण्यात आला होता.

उज्ज्वल निकम यांनी हे वक्तव्य मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर राकेश मारिया यांच्या त्या दाव्यानंतर केले होते ज्यामध्ये म्हटले होते की, लष्कर-ए-तोयबाने 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी आणि पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाबला बेंगळुरुच्या समीर चौधरीच्या रूपात मारण्यासाठी प्रोजेक्ट करण्याची योजना बनवली होती.

माजी कमिश्नर मारिया यांनी सोमवार प्रकाशित केलेल्या आपल्या पुस्तकात 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात त्यांनी केलेल्या तपासाचा उल्लेख केला आहे. या दहशतवादी हल्ल्याची योजना लष्करने तयार केली होती आणि त्यामध्ये पाकिस्तानचा हात होता.

26/11 दहशतवादी हल्ल्याला हिंदू दहशतवादाच्या रूपात सादर करण्याची लष्कर ए तोयबाची योजना होती, असा उल्लेख करून मारिया यांनी लिहिले आहे की, जर सर्व काही त्यांच्या योजनेप्रमाणे झाले असते, तर कसाब समीर चौधरीच्या रूपात मारला गेला असता आणि मीडियाकडून हल्ल्यासाठी हिंदू दहशतवाद्यांना दोषी ठरवले गेले असते. त्यांनी पुस्तकात हा उल्लेख केला आहे की, दहशतवादी संघटनेने पाठवलेल्या दहशतवाद्यांना भारतीय पत्ते असलेली आणि हिंदू नावे असलेली बनावट ओळखपत्र दिली होती.

You might also like