देशातील विध्यार्थ्यांसाठी खुशखबर ! शिक्षण पूर्ण झाल्यावर UK मध्ये २ वर्षांचं वर्क परमिट मिळणार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – उच्चशिक्षण घेऊन काम करण्याची किंवा शिक्षण घेण्याची  इच्छा असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देताना ब्रिटनने त्यांच्या देशात  शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन पोस्ट-वर्क व्हिसा पॉलिसी जाहीर केली आहे. यूकेच्या या घोषणेने तेथील शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांची कारकीर्द वाढविण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल समजले जात आहे. यूकेने आपल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांसाठी वर्क व्हिसा कालावधी २ वर्षांपर्यंत वाढविला आहे.

ब्रिटीश माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ब्रेक्झिटनंतर परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास पूर्ण केल्यावर २ वर्षाच्या वर्क व्हिसामध्ये वाढ करण्याचे नवीन धोरण जाहीर केले आहे. २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशादरम्यान हे नवीन धोरण सुरू केले जाईल.

२०१२ मध्ये बंद करण्यात आली होती योजना :

तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान टेरेसा यांनी २०१२ मध्ये ही योजना रद्द केली होती. त्यानंतर घटलेली परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढवता यावी यासाठी आता हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. भारताच्या दृष्टीकोनातून पाहता  भारतीय विद्यार्थ्यांना या नवीन धोरणाचा मोठा फायदा होईल. नवीन धोरण आल्यानंतर यूकेमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थी पुढील २ वर्षे तेथे काम करण्याचे किंवा करियर बनविण्याचे किंवा त्यांच्या आवडीनुसार काम करण्याचे ठरवू शकतात.

ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल म्हणाले की या नव्या धोरणामुळे हुशार परदेशी विद्यार्थ्यांना, विशेषत: विज्ञान, गणित किंवा तंत्रज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासानंतर बहुमोल अनुभव मिळू शकेल आणि आपली कारकीर्दही पुढे नेऊन चमकावता येईल.

भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ :

ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षात भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. जून २०१९ अखेर भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढून २२ हजार झाली आणि मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ ४२ टक्के आहे. मागील ३ वर्षात यात १०० टक्के वाढ दिसून येते. चांगली गोष्ट म्हणजे अर्ज करणारे ९६ टक्के विद्यार्थी ब्रिटिश व्हिसा मिळवतात. याचा अर्थ असा आहे की मोठ्या संख्येने भारतीय ब्रिटनमध्ये जाण्यास सक्षम आहेत.

तत्पूर्वी, यूकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय जाहीर केला की, यूकेमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणतेही बंधन नाही आणि परदेशी विद्यार्थ्यांमध्ये ही लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी ब्रिटन प्रयत्न करीत आहे आणि त्याकरिता काम करेल. व्हिसाचा कालावधी वाढविला जाईल. पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासानंतरची रजा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढविला जाऊ शकतो आणि डॉक्टरेट विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी एक वर्षासाठी वाढविला जाऊ शकतो.

शिक्षण विभागाने असे म्हटले आहे की अर्जदारांसाठी व्हिसा प्रक्रिया कशी सुधारली पाहिजे तसेच अभ्यास केल्यावर त्यांच्या रोजगारासाठी एक चांगले वातावरण कसे तयार करावे यावर सरकार विचार करेल.

Loading...
You might also like