भारतानंतर आता ब्रिटननं दिला चीनला जबरदस्त झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन या दोन देशांतील संबंध गेल्या अनेक दिवसांपासून बिघडले आहेत. चीनला धडा शिकवण्यासाठी भारताने एकामागून एक झटके देण्यास सुरुवात केली. भारत सरकारने 59 चायनीज अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनने थयथयाट केला. भारताने चीन विरोधात भूमिका घेतल्यानंतर आता अनेक देश चीनच्या विरोधात भूमिका घेत आहे. या यादीमध्ये आता ब्रिटनचा देखील समावेश झाला आहे.

ब्रिटनच्या सरकारने 5जी वायरलेस नेटवर्क डेव्हलप करण्यासाठी जपानकडे मदत मागितली आहे. यापूर्वी ब्रिटनमध्ये हुवावे 5जी नेटवर्क डेव्हलप करणार होती. ब्रिटनने काही दिवसांपूर्वी हुवावेवर बंदी घातली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून टेक्नॉलॉजी आणि सिक्योरिटीवरून तणाव निर्माण झाला आहे.

ब्रिटन हुवावेचे उपकरण हटवणार

ब्रिटनने चीनच्या Huawei पासून वेगळे होताना लवकरच आपले 5जी नेटवर्क वरून हुवावेचे उपकरण हटवण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनने काही दिवसांपूर्वीच युरोपियन युनियन मधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेत हुवावेला बंदी

चीनच्या हुवावेवर अमेरिकेत बंदी घातली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. हुवावेवर बंदी घातल्यानंतर कंपनी गुगल सर्विसचा वापर करू शकत नाही.

भारताकडून 59 अ‍ॅप्सवर बंदी

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. यानंतर अमेरिका आणि ब्रिटन यांनी चीनी कंपनी हुवावेवर बंदी घातली. भारताने बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये प्रसिद्ध टिकटॉकचा समावेश आहे. टिकटॉक शिवाय यूसी ब्राउजर, हेलो, विगो, शेअर इट सारख्या अ‍ॅप्सवर भारताने बंदी घातली आहे.

4G पेक्षा 5G नेटवर्क खास

5जी युजर्संना 4 जी नेटवर्कपासून 20 पट जास्त स्पीड मिळणार आहे. या स्पीडचा अंदाज यावरुन बांधता येवू शकतो, की एक संपूर्ण एचडी फिल्म केवळ एका सेकंदात डाऊनलोड करता येऊ शकते. 5जी युजर्सला गर्दीतही आपल्या मोबाईल प्रोव्हाईडर पासून कनेक्ट होण्यास 3 जी आणि 4जी नेटवर्कच्या तुलनेत कोणतीही अडचण नाही. एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटपर्यंत डेटाचा एक पॅकेट पोहचण्यासाठी जितका वेळ लागतो त्याला लेंटेंसी म्हणतात. 5जी मध्ये लेटेंसी रेट एक मिलिसेकंद असेल तर 4जी मध्ये हा रेट 10 मिलीसेकंत आहे.