चिंताजनक ! … तर ‘या’ देशात लाखो लोकांना ‘कोरोना’चा संसर्ग

पोलिसनामा ऑनलाईन टीम : कोरोना मुळे जगभरातील तब्ब्ल १४० च्या वरील देशांना विळखा घातला असून. आतापर्यंत १६४,८३७ लोकांना त्याच्या संसर्ग झाला आहे. तर ६००० पेक्षा जास्ती लोकांनी यात आपला जीव गमावला असून, कोरोना व्हायरसच्या संसर्गावर लस तयार करण्याचे प्रयत्न जगभरात सुरु आहेत. लवकरच लस न सापडल्यास येत्या हिवाळ्यात शास्त्रज्ञांनी ‘कोरोनाची दुसरी लाट’ येण्याचा इशारा दिला आहे.चीन मध्ये बऱ्यापैकी कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आले असले तरी युरोपाधील, स्पेन, फ्रान्स आणि आता ब्रिटन या देशांमध्ये ह्या संसर्गाचा झपाट्याने प्रसार होत आहे.कोरोनोमुळे ब्रिटन देश उद्धवस्त होण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

‘द गार्डियन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, कोरोनो संसर्गाचा प्रभाव आणखी एक वर्ष राहणार असून त्याचे ब्रिटनमध्ये घटक परिणाम दिसणार आहे.

याबाबत ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सिस्टीमच्या (एनएचएस) अधिकाऱ्याने ‘पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) अहवालाबाबत माहिती दिली असल्याचा दावा ‘द गार्डियन’ ने केला आहे. या अहवालात पुढील १२ महिने ब्रिटनला कोरोना व्हायरस सोबत लढावे लागणार आहे. यामध्ये जवळपास ८ लाख लोकांना संसर्ग होण्याची भीती सतावत आहे. आगामी १२ महिने ब्रिटनची प्रचंड महत्वाचे असणार असल्याचे या अहवालात नमुद केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी लसीचा अभाव आणि कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या प्रसारामुळे ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढणार असल्याची भीती या अहवालात नमूद करण्यात आलीय. त्याशिवाय आगामी काळात ८ लाख नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ब्रिटन सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार प्राध्यापक ख्रिस व्हीट्टी यांनी सांगितले की,या अहवालात नमूद करण्यात आलेला अंदाज वस्तुस्थितीनुसार नाही. कोरोनाचा संसर्ग यापेक्षाही कमी जणांना होईल.