लंडन न्यायालयाचे अनिल अंबानींना 717 दशलक्ष डॉलर्सची रक्कम भरण्याचे आदेश

पोलिसनामा ऑनलाईन – रिलायन्स (एडीएजी) समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. लंडनमधील एका न्यायालयाने त्यांना चीनच्या तिन बँकांची 717 दशलक्ष डॉलर्सची रक्कम फेडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना 21 दिवसांमध्ये ही रक्कम फेडावी लागणार आहे. या प्रकरणात अनिल अंबानी यांची वैयक्तिक हमी आहे. यामुळे त्यांना ही रक्कम भरावीच लागेल, असे हायकोर्ट ऑफ इंग्लंड अँड वेल्सच्या व्यावसायिक विभागाच्या न्यायमूर्ती नीगेल टियरे यांनी सांगितले आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड द्वारे 2012 मध्ये घेण्यात आलेल्या व्यावसायिक कर्जाची निगडीत असल्याची माहिती अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी दिली. यासाठी त्यांनी वैयक्तीक हमी दिली होती, असंही ते म्हणाले. परंतु अनिल अंबानी यांनी हे कर्ज वैयक्तिकरित्या घेतले नव्हते. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायनाने (खउइउ) दावा त्या आधारावर केला आहे ज्या हमीपत्रावर अनिल अंबानी यांनी कधी स्वाक्षरीचे केली नसल्याचे सांगण्यात आले आहे. अंबानी हे सध्या अन्य कायदेशीर बाबींची चर्चा करत आहेत. त्यानंतरच ते पुढील कार्यवाही करणार आहेत.

हे प्रकरण इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना लि. मुंबई शाखा, चायना डेव्हलपेंट बँक आणि एक्झिम बँकेशी निगडीत आहे. फेब्रुवारी महिन्यात या बँकांच्या बाजूने एक सशर्त आदेश जारी करण्यात आला होता.न्यायमूर्ती डेव्हिड वॅक्समन यांनी 7 फेब्रुवारी रोजी या खटल्याची सुनावणी घेऊन 2021 मध्ये पूर्ण सुनावणी होईपर्यंत सहा आठवड्यांत 10 कोटी डॉलर्सची रक्कम भरण्याचे आदेश अंबानींना दिले होते. परंतु आता या रकमेत 7 लाख 50 हजार पौंडांची अधिक रक्कम जोडण्यात आली आहे.