Coronavirus : ब्रिटिश सरकारला मिळाली गुप्त माहिती, ‘कोरोना’च्या पाठीमागं असू शकते चीनी ‘लॅब’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   चीनमधील पशु बाजारातून कोरोना विषाणूचा प्रसार झाला, या सिद्धांतावर बरेच लोक विश्वास ठेवत नाहीत. विषाणूच्या प्रसाराचे कारण शोधण्यासाठी सरकार हेरगिरी करीत आहेत. प्रथम हा विषाणू चायनीज लॅबमधून जनावरांमध्ये पसरला गेला होता आणि नंतर तो मानवांमध्ये पसरला होता, अशी माहिती ब्रिटन सरकारला मिळाली.

ब्रिटनमधील सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा विषाणू लॅबमधून जनावरांमध्ये आणि जनावरांमधून मनुष्यांमध्ये पसरला आहे. जरी वैज्ञानिकांच्या मते हा विषाणू वुहानच्या पशु बाजारातून मनुष्यांमध्ये पसरला असेल, परंतु चिनी लॅबमधून होणाऱ्या गळतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एका अहवालानुसार, बोरिस जॉनसन यांनी स्थापन केलेल्या आपत्कालीन समिती कोब्राच्या सदस्याने सांगितले की, काल रात्री गुप्तचर माहिती मिळाली होती, त्यानुसार हा विषाणू प्राण्यांद्वारेच पसरला आहे. परंतु वुहानच्या लॅबमधून बाहेर पडल्यानंतरच हा विषाणू पहिल्यांदा मानवांमध्ये पसरला होता यास देखील नाकारता येत नाही.

पशु मार्केटपासून फार दूर नाही व्हायरोलॉजी केंद्र

सुरक्षा सेवेकडून कोब्राला या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘विषाणूच्या स्वरूपाविषयी एक विश्वासार्ह पर्यायी कल्पना आहे. वुहानमध्ये लॅब अस्तित्त्वात आहेत हा योगायोग नाही. ही वस्तुस्थिती वगळता येणार नाही.’ वुहानमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी अस्तित्त्वात आहे. ही चीनमधील सर्वात प्रगत प्रयोगशाळा आहे. ही संस्था पशु बाजारापासून अवघ्या दहा मैलांवर आहे. उल्लेखनीय म्हणजे एका चिनी वृत्तपत्राने 2018 मध्ये म्हटले होते की ही प्रयोगशाळा प्राणघातक इबोला विषाणू सारख्या सूक्ष्मजीवावर प्रयोग करण्यास सक्षम आहे.

पहिल्यांदा लॅब कर्मचाऱ्यांना झाले संक्रमण?

असे वृत्त देखील समोर आले होते की पहिल्यांदा इंस्टिट्यूटच्या कर्मचार्‍यांच्या रक्तामध्ये संसर्ग झाला आणि त्यानंतर स्थानिक लोकांमध्ये याचा संसर्ग झाला. त्याचबरोबर वुहान सेंटर फॉर डिसिज कंट्रोलही बाजारापासून तीन मैलांच्या अंतरावर आहे. असे मानले जाते की येथे ही पशूंसारखे वटवाघुळांवर प्रयोग केले गेले आहेत, जेणेकरुन कोरोना विषाणूच्या प्रसाराची माहिती समोर येईल.

2004 मध्ये चीनच्या लॅबमधून सार्स सारखा विषाणू लीक झाला होता. ज्या कारणाने तेथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि इतर 9 लोकांना संसर्ग झाला. त्यानंतर चिनी सरकारने असे म्हटले की हे निष्काळजीपणामुळे घडले आणि 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिक्षा ठोठावली.