Coronavirus : काय सांगता ! होय, इंग्लंडच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांना ‘कोरोना’ची लागण

लंडन : वृत्तसंस्था – जगभरातील शंभर देशामध्ये कोरोनाने थैमान घातले असून आतापर्यंत कोरोनोमुळे जगभरात साडेतीन हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातले सर्वच देश कोरोनोपासून संरक्षण करण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी पावलं उचलत असताना दिसताहेत. ब्रिटनमध्येही कोरोनाचा फैलाव झाला असून ब्रिटनच्या खासदार आणि आरोग्य मंत्री नदीन डॉरीस यांना कोरोनोची लागण झाली आहे.

नदीन यांनी मंगळवारी पत्रकद्वारे सांगतिले की, “माझी कोरोनोची चाचणी पॉसिटीव्ह आली असून मी स्वतःला घरातल्या सदस्यांपासून दूर ठेवलं आहे.” नदीन डॉरीस यांना कोरोनाची बाधा नेमकी कुठे आणि कशी झाली याचा तपास आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

डॉरीस यांनी घेतली होती पंतप्रधानांची भेट

कोरोनोला रोखण्यास उपाय योजना करण्यासाठी डॉरीस यांनी गेल्या काही दिवसांत अनेक बैठक घेतल्या असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरही व्यक्तींना कोरोनोची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नदीन डॉरीस या कोरोनोची लागण झालेल्या ब्रिटनमधल्या पहिल्या राजकीय नेत्या आहे. मिळालेल्या माहितीनूसार, डॉरीस यांनी गेल्या काही दिवसात शेकडो लोकांच्या गाठी भेटी घेतल्या त्यात वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान बेरीस जॉन्सन यांचाही समावेश आहे.

कोरोनोला विमा संरक्षण संदर्भात कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच दिवशी नदीन या आजारी पडल्या. राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी योग्य सल्ला आणि सहकार्य केल्याबद्दल पत्रकात त्यांनी धन्यवाद मानले आहे. ब्रिटन मध्ये ३७३ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६ जणांनी जीव गमावला आहे.