महिला सहकार्‍याचं चुंबन घेतानाचे फोटो झळकले वर्तमान पत्रात, युकेच्या आरोग्य सचिवांचा राजीनामा

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना नियमांचे उल्लंघन करत आपल्या कार्यालयातील महिलेला मिठी मारल्याने आणि चुंबन (Kiss) घेतल्या प्रकरणी ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅन्कॉक (Matt Hancock) यांना राजीनामा द्यावा लागला आहे. हँकॉक यांनी आपला राजीनामा पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Prime Minister Boris Johnson) यांच्याकडे सोपवला असून त्यांनी तो स्विकारला आहे. द सन या ब्रिटीश वृत्तपत्राने हॅन्कॉक यांचे महिला सहका-याचे चुंबन घेतानाचे फोटो प्रसिध्द केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. हे फोटो मे महिन्यात ज्यावेळी ब्रिटनमध्ये कोरोना नियम कडक केले होते त्यावेळचे आहेत.

विवाहित मॅट हँकॉक यांनी आपल्या कार्यालयाच्या कामगिरीची माहिती ठेवण्यासाठी या महिलेची नियुक्ती केली होती. ब्रिटन सरकारच्या कोरोनाविरोधातील लढाईत मॅट हँकॉक महत्वाची भूमिका निभावत होते. विशेष म्हणजे अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांनी कोरोनाविरोधातील लढाईत नागरिकांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. मॅट हँकॉक यांनी पंतप्रधान जॉन्सन यांना लिहिलेल्या पत्रात आपल्या कुटुंबाची माफी मागितली आहे. नियमाचे उल्लंघन करत आपण कोरोनाविरोधातील लढ्यात आपलं खूप काही गमावणाऱ्यांना आम्ही देणं लागतो असेही म्हटले आहे.

हे देखील वाचा

Ajit Pawar | संजय राऊतांचा संतप्त सवाल, म्हणाले – ‘अटक आरोपीच्या पत्रावर अजितदादांची CBI चौकशी कशी काय होऊ शकते?’

call girl | कैद्यानं जेलमध्ये बोलावली कॉलगर्ल, व्हायरल फोटोमुळे खळबळ

BJP MLA | भाजप आमदाराकडून अधिकारी पत्नीचा छळ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ

Zydus Cadila Vaccine | 12-18 वर्षाच्या मुलांसाठी लवकरच येत आहे zydus-cadila ची लस, सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितले

Family Pension | मोदी सरकारने दिला मोठा दिलासा ! पेन्शनरच्या मृत्यूनंतर आता कुटुंबाला पेन्शन मिळवण्यास येणार नाही अडचण, बँकांना दिले ‘हे’ निर्देश


Pollution and Corona | प्रदूषणाचं कोरोना कनेक्शन? देशात जिथं Pollution जास्त तिथं कोविड-19 जास्त घातक होता, स्टडीमध्ये मुंबई अन् पुण्याचा समावेश


Bigg Boss Fame Actress | ईगतपुरीमधील रिसॉर्टमध्ये पोलिसांचा छापा; ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांची ‘रेव्ह पार्टी’ उधळली

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : uk health secretary matt hancock resigns after caught kissing aide in violation of covid norms

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update