नोव्हेंबरमध्येच ऑक्सफोर्डची ‘कोरोना’ लस मिळण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना लस (corona vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा असताना ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीबाबत (oxford corona vaccine) गूड न्यूज मिळाली आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (oxford university) आणि अ‍ॅस्ट्राझेनका कंपनीने (AstraZeneca) तयार केलेली कोरोना लस नोव्हेंबरमध्येच (november) मिळण्याची शक्यता आहे. या लशीत भारताच्या सीरम इन्स्टिट्युटची (serum institute of india) भागीदारी आहे. या लशीची सध्या चाचणी सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.

वयस्कर आणि तरुण दोन्ही वयोगटातील व्यक्तींमध्ये या लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये अँटिबॉडी आणि टी-सेलची निर्मिती झाली आहे. वयस्कर व्यक्तींवर याचा दुष्परिणामही कमी पाहायला मिळाला आहे.लंडनमधील रुग्णालयांना कोरोना लशीसाठी तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. द सनच्या बातमीचा हवाला देत रॉयटर्सने हे वृत्त दिलं आहे.पोर्टनुसार लवकरच रुग्णालयांना कोरोना लशीची पहिली बॅच पुरवली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

You might also like