21 वर्षानंतर सापडलेल्या ‘पोकीमॉन’ कार्डसाठी तब्बल इतक्या लाखांची बोली, तरूण झाला ‘मालामाल’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लहानपणी पोकीमॉन कार्ड म्हणजे अनेकांसाठी जीव की प्राण होते. या पोकेमॉन कार्डचा लिलाव करुन एक 34 वर्षीय व्यक्ती लखपती झाला आहे. त्याला वयाच्या 13 व्या वर्षी गिफ्ट म्हणून मिळालेला पोकेमॉन कार्डचा 103 पत्त्यांचा सेट लिलावामध्ये विकून या व्यक्तीने चक्क 33 लाखांची कामाई केली आहे. ब्रिटनमधील बर्मिंगहम येथे राहणार्‍या निगेल ब्रुक्सला वयाच्या 13 व्या वर्षी भेट म्हणून पोकेमॉन कार्डचा सेट मिळाला होता. छोट्या भावाला शाळेमध्ये होणार्‍या बुलिंगपासून म्हणजेच इतर विद्यार्थ्यांकडून होणार्‍या छळापासून वाचवल्यामुळे निगेलला त्याच्या आईने हा पोकेमॉन पत्त्यांचा कॅट बक्षिस म्हणून गिफ्ट केला होता.

निगेलचा वाढदिवस असल्याने टू इन वन कारण देत त्याच्या आईने हे गिफ्ट त्याला दिले होते. मात्र निगेल काही पोकेमॉनचा चाहता नसल्याने आईने त्याला त्यावेळी दिलेले 300 पौंडचे (28 हजार रुपये ) हे गिफ्ट आवडले नव्हते. गिफ्ट मिळाल्याने निगेलने हा पत्त्यांचा कॅट कुठेतरी अडगळीच्या खोलीत ठेवला. 21 वर्षानंतर तो निगेलला पुन्हा सापडला असून त्याचे आश्चर्य वाटत आहे.

विशेष म्हणजे आता निगेलला हा कॅट सापडल्यानंतर पोकेमॉनचे एवढे पत्ते एकाच कलेक्शनमध्ये असणे अत्यंत दुर्मिळ असल्याचे समजले. हा कॅट त्याने लिलाव करण्याचा ठरवले. या पत्त्यांसाठी फारसे पैसे मिळतील अशी अपेक्षा निगेलला नव्हती. मात्र त्याने थेट 103 पोकेमॉनची माहिती असणार्‍या पत्त्यांचा कार्ड लिलावासाठी काढल्याचे समजल्यानंतर पोकेमॉन चाहत्यांच्या यावर उड्या पडल्या. अखेर एका पोकेमॉन चाहत्याने चक्क 35 हजार पौंड म्हणजेच 33 लाख 28 हजार रुपये दिले आहेत.