ब्रिटनच्या संसदेत शेतकरी आंदोलनाचा मुद्दा; कन्फ्यूज पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले – ‘हे भारत-पाकिस्तानचे प्रकरण’

लंडन : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असलेले आंदोलन इतर देशांमध्ये पोहचले आहे. अमेरिकेत यासाठी शेतकर्‍यांच्या समर्थनासाठी रॅली निघाल्या होत्या, तर बुधवारी ब्रिटनच्या एका खासदाराने संसदेत हा मुद्दा उचलून धरला. विरोधी पक्ष लेबर पार्टीचे शिख खासदार तनमनजीत सिंह ढेसी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना शेतकर्‍यांच्या आंदोलनावर प्रश्न विचारले, मात्र, जॉन्सन कन्फ्यूज झाले. त्यांनी हे संपूर्ण प्रकरण भारत-पाकिस्तानचे प्रकरण असल्याचे सांगितले. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ वायरल होत आहे.

ब्रिटिश शिख खासदार तनमनजीत सिंह ढेसी यांनी पंतप्रधान प्रश्न सत्रात (पीएमक्यूएस) बोरिस जॉन्सन यांना म्हटले, पंजाब आणि भारतातच्या अन्य भागात शेतकर्‍यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर वॉटर कॅनन, आश्रुधूर आणि पोलीस बळाचा वापर होत असल्याचे फुटेज पाहून खुप भयभीत आहोत. मात्र, जे शेतकर्‍यांना मारत होते, त्यांना ते खाऊ घालत होते. हे पहाणे खुप सुखकारक आहे. ही अदम्य भावना आहे आणि असे करण्यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या लोकांची आवश्यकता असते.

विरोधी पक्षाच्या खासदाराने पुढे म्हटले की, पंतप्रधान (बोरिस जॉन्सन) भारतीय पंतप्रधान (नरेंद्र मोदी) यांना आमची चिंता कळवतील का? आणि ते गोष्टीशी सहमत आहे का की, सर्वांना शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार आहे.

विरोधी खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी उत्तर दिले. मात्र, ते संपूर्ण प्रकरण समजू शकले नाहीत आणि यास भारत-पाकिस्तानचे प्रकरण असल्याचे म्हटले. जॉन्सन यांनी खासदार तनमनजीत सिंह यांना उत्तर देताना म्हटले, आमचे मत हे आहे की, जे काही भारत-पाकिस्तानमध्ये होत आहे, याच्याबाबत आम्हाला गंभीर चिंता आहे, परंतु हे त्या दोन सरकारांचे प्रकरण आहे.

भारतातील शेतकर्‍यांच्या प्रकरणाला पाकिस्तानशी जोडणार्‍या बोरिस जॉन्सन यांच्या उत्तरानंतर खासदार तनमनजीत यांना खुपच धक्का बसल्याचे दिसत होते. वायरल व्हिडिओत ते विचित्र पद्धतीच्या उत्तरावर रिअ‍ॅक्शन देताना दिसले. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर खासदार तनमनजीत आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे प्रश्न-उत्तराचे हे दृश्य खुपच वायरल होत आहे. यूजर्स व्हिडिओवर विविध प्रकारचे कमेंट करत आहेत.