Coronavirus Lockdown : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या दहशतीखाली ब्रिटन, PM बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा लावला लॉकडाऊन

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (uk prime minister boris johnson ) यांनी कोरोना (Coronavirus ) संसर्गाच्या नव्या स्ट्रेनची वाढती प्रकरणे पाहता देशात लॉकडाऊनची (Lockdown)  घोषणा केली आहे. बोरिस जॉन्सन (uk prime minister boris johnson ) यांनी म्हटले की, कोरोनाच्या विरूद्ध लढाईसाठी कमीत कमी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत नवा स्टे-ऑन-होम लॉकडाऊन (Lockdown)  लावला आहे, जेणेकरून जो घातक व्हायरस वेगाने पसरत आहे, त्याला रोखता येऊ शकते.

या घोषणेसह ब्रिटिश पीएमने लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले. मंगळवारपासून शाळा, कॉलेज आणि यूनिव्हर्सिटी, ऑनलाइनच चालतील. लॉकडाऊनच्या घोषणेसह आता लोकांचे घरातून बाहेर पडणे जवळपास बंद होईल. केवळ आवश्यक कामासाठी लोक बाहेर पडू शकतील.

पंतप्रधान बोरीस यांनी सोमवारी रात्री देशाला संबोधित करताना म्हटले की, ज्याप्रमाणे संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत, यावरून स्पष्ट होते की, आपल्याला आणखी मेहनत करण्याची गरज आहे. इंग्लंडमध्ये आपल्याला एक राष्ट्रीय लॉकडाऊनमध्ये गेले पाहिजे कारण नव्या स्ट्रेनविरूद्ध हे कठोर पाऊल योग्य आहे. याचा अर्थ असा की, सरकार पुन्हा एकदा आपल्याला घरात राहण्याचे निर्देश देत आहे.

आवश्यक कामांसाठीच बाहेर पडा
त्यांनी हे सुद्धा म्हटले की, लोक कामासाठी घरातून बोर पडू शकतात. जसे की, आवश्यक सामान, जर वर्क फ्रॉम होम करता येत नसेल तर ऑफिसला जाण्यासाठी, एक्सरसाइज़, मेडिकल मदत आणि घरगुती हिंसेपासून वाचण्यासाठी बाहेर पडू शकता.

अन्य युरोपच्या तुलनेत ब्रिटनमध्ये जास्त लोकांना व्हॅक्सीन दिली : पीएम
त्यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये लसीकरणाचा सर्वात मोठा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि बाकी युरोपच्या तुलनेत जास्त लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे. लसीकरणाला वेग येत आहे. याचे कारण ऑक्सफ़ोर्ड-एस्ट्राजेनेका व्हॅक्सीन आहे, जिचे लसीकरण आजपासूनच सुरू करण्यात आले आहे.