ब्रिटनच्या राजवाड्यात हाउसकिपिंगसाठी भरती, पगार ऐकून येईल चक्कर !

लंडन : वृत्तसंस्था – ब्रिटनच्या (Britain) राजघराण्याविषयी अनेकांना विशेष कौतुक आणि कुतूहल असते. त्याचबरोबर त्यांच्या राजवाड्यात नोकरी ( Job) करण्याचेही अनेकजण स्वप्न पाहत असतात. आता अशा व्यक्तींना ही संधी चालून आली आहे. ब्रिटनच्या शाही राजवाड्यात हाऊसकिपिंगच्या ( Housekeeping) कामासाठी पगार ( Salary) ऐकाल तर चक्रावून जाल. या कामासाठी जवळपास १८ लाख ५० हजार इतका पगार असणार आहे. त्यामुळे भारतात एखाद्या मॅनेजरला देखी इतका पगार नसतो तितका पगार देखील घरकाम करणाऱ्याला मिळतो. यासाठी ब्रिटनच्या राजघराण्याने याबाबतची जाहिरात त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.

भरती करण्यात येणारे हाउसकिपिंगमधील हे पद ॲप्रेंटीसशिप वर्ग २ मधील आहे. निवड होणाऱ्या उमेदवाराला ब्रिटनच्या रॉयल पॅलेसमध्ये रहावे लागणार आहे. त्याशिवाय, विंडसर कॅसल आणि आजूबाजूच्या परिसरात व बकिंगहॅम पॅलेसमध्ये काम करावे लागणार आहे. राजवाड्यातील आतील भाग आणि त्यातील वस्तूंची निगा राखण्याची जबाबदारी या उमेदवारावर असणार आहे. या कामासाठी त्याला प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवाराला इंग्रजी आणि गणिताचे ज्ञान आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याची निवड झाली आणि त्याला या विषयाचे ज्ञान नसेल तर त्याला ते शिकावे लागणार आहे. त्याचबरोबर या पदासाठी हाउसकिपिंगचा अनुभव असणाऱ्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

निवड झालेल्या उमेदवाराला १३ महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.निवड होणाऱ्या व्यक्तीला पगाराशिवाय प्रवास व इतर भत्तेही असणार आहेत. त्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आलिशान सुविधाही मिळणार आहेत. त्याशिवाय टेनिस कोर्ट, स्विमिंग पूलसह इतर सुविधाही मिळणार आहेत. आठवड्याला पाच दिवस काम असणार आहे. तर, वर्षाला ३३ दिवस सुट्टी मिळणार आहेत. पण यासाठी निवड प्रकिया प्रचंड अवघड असून अर्ज आणि मुलाखत पार पाडावी लागणार आहे. या नोकरभरतीची जबाबदारी असणाऱ्या कंपनीच्या फिलीपा स्मिथ यांनी सांगितले की, योग्य उमेदवार शोधणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे.

राजेशाही कुटुंबात काम करताना, प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळी असते. त्याशिवाय उमेदवाराच्या शिक्षणापेक्षा कौशल्य आणि प्रशिक्षणावर अधिक भर दिला जातो. याचबरोबर या पदासाठी अर्ज करण्याची मुदत ही २८ ऑकटोबर असून केंब्रिजचे राजकुमार विल्यम आणि त्यांची पत्नी केट हे वास्तव्यास असलेल्या केन्सिग्ंटन पॅलेसमध्ये या जागेची भरती करण्यात येणार आहे.त्यामुळे तुम्ही देखील या पदासाठी अर्ज करू शकता.