Coronavirus updates ब्रिटीश शास्त्रज्ञांना मोठे यश; ’असा’ रोखता येणार कोरोनाचा संसर्ग !

लंडन : कोरोनाची लस देण्यासाठी लसीकरण अभियान जगभर सुरू असले तरी या महामारीचे संकट अजूनही कायम आहे. अनेक देशात रूग्ण आजही वाढत आहेत. दरम्यान, ब्रिटनच्या शास्त्रज्ञांना याबाबतीत एक मोठे यश मिळाले आहे. बर्मिंगहम विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी करोना विषाणूचा संसर्ग रोखणारा एक नेझल स्प्रे बनवला आहे. हा नेझल स्प्रे लवकरच सर्वत्र उपलब्ध होणार आहे.

’द संडे टेलिग्राफ’ला या संशोधनातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रिसर्च मोक्स यांनी सांगितले की, सोशल डिस्टेसिंगपासून दिलासा आणि शाळा पुन्हा करताना हा नेझल स्प्रे खुप उपयोग ठरेल. यास सध्या कोणतेही नाव देण्यात आलेले नाही. शिवाय, यामध्ये वापरलेल्या रसायनांना वैद्यकीय वापरासाठी मान्यता आहे. यामुळे तो मानवी वापरास सुरक्षित आहे.

शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, हा स्प्रे दिवसातून 4 वेळा वापरल्याने करोनाच्या विषाणूपासून बचाव होऊ शकतो. शाळा तसेच करोना संसर्गाचा धोका असलेल्या ठिकाणी याचा वापर केल्यास धोका कमी होऊ शकतो. ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर सुरू असल्याने हा स्प्रे खुप उपयोगी ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले की, नव्या स्ट्रेनमुळे मृतांची संख्या वाढण्याचा धोका असल्याचे भीती आहे. करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असताना दुसरीकडे मृत्यू दरही वाढण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. करोनाच्या या नव्या स्ट्रेनवर फायजर-बायोएनटेक आणि ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस प्रभावी आहे. ब्रिटनमध्ये महिनाभरापासून करोनाच्या नव्या स्ट्रेनने हाहाकार उडवला आहे. विषाणूचा संसर्ग वेगाने होत असल्याने रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.