चांगली बातमी : भारताला ‘कोरोना’च्या नव्या रूपाला ‘आयसोलेट’ करण्यात यश !

नवी दिल्ली : भारताने ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसचे नवे रूप सार्स-कोव्ह-2 ची ’कल्चर’ टेस्ट केली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council of Medical Research) म्हणजे आयसीएमआरने (ICMR) दावा केला आहे की, त्यांनी ब्रिटनहून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची यशस्वीपणे ’कल्चर’ टेस्ट करून ’आयसोलेट’ केले आहे. यामुळे कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनचा उपचार सोपा होईल. आयसीएमआरने (ICMR)  म्हटले की, भारत असे करणारा जगातील पहिला देश आहे.

आयसीएमआरने शनिवारी म्हटले की, ज्या दिवसापासून कोविड-19 महामारी समोर आली होती, त्या दिवसापासून त्याच्या ’कल्चर’साठी शोध सुरू होते. नुकतेच ब्रिटनहून भारतात परतलेल्या लोकांचे सॅम्पल नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये ’कल्चर’ टेस्ट करण्यात आली. यामध्ये व्हायरसच्या नव्या स्ट्रेनला आयसोलेट म्हणजे वेगळे करण्यात यश आले आहे. आतापर्यंत कोणत्याही अन्य देशाला नवा स्ट्रेन वेगळा करण्यात यश आलेले नाही.

काय आहे’कल्चर’ची प्रक्रिया
‘कल्चर’ एक अशी प्रक्रिया आहे, ज्या अंतर्गत पेशींना नियंत्रित स्थितीत निर्माण केले जाते, सामान्यपणे त्याच्या नैसर्गिक वातावरणाच्या बाहेर असे केले जाते. आयसीएमआरने एका ट्विटमध्ये दावा केला की, कोणत्याही देशाने ब्रिटनमध्ये आढळलेल्या सार्स-कोव्ही-2 च्या नव्या प्रकाराला अजूनपर्यंत यशस्वीपणे पृथक किंवा ‘कल्चर’ केलेले नाही.

उल्लेखनीय आहे की, ब्रिटनने नुकतीच घोषणा केली होती की, तिथे लोकांमध्ये व्हायरसचा एक नवीन प्रकार आढळला आहे, जो 70 टक्केपर्यंत जास्त संसर्गजन्य आहे. केंद्रीय अरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले होते की, सार्स-कोव्ही-2 च्या या नव्या ‘स्ट्रेन’ने भारतात आतापर्यंत एकुण 29 लोक संक्रमित झाले आहेत.

दुसरीकडे 2021 मध्ये शनिवारी भारतासाठी आणखी एक खुशखबर आली आहे. केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने स्वदेशी रूपाने विकसित कोविड-19 विरोधी लस ‘कोव्हॅक्सीन’ला काही अर्टीसह आत्कालीन स्थितीत वापरास मंजूरी देण्याची शिफारस केली आहे.