जे पायी चालतात त्यांना ही बँक देते 21 टक्के व्याज

किव : वृत्तसंस्था –आपण जी रक्कम बँकेत ठेवतो त्यावर आपल्याला ठराविक टक्के व्याजदर बँकेकडून दिला जातो हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु तुम्ही पायी चालल्यावर एखादी बँक तुमच्या जमा पैशांवर व्याज देते असा तुम्ही कधी विचारही केला नसेल एवढे मात्र नक्की. तुम्हाला विश्वास बसणार नसला तरी हे खरं आहे की, एक बँक अशी आहे जी पायी चालल्यावर तुमच्या जमा रकमेवर 21 टक्के व्याज देते. हो चक्क 21 टक्के व्याज देते. एखाद्या बँकेतील फिक्स डिपाॅझीटवरही तुम्हाला इतके व्याज मिळणार नाही जितके ही बँक तुम्हाला पायी चालल्यावर देत आहे. युक्रेनमधील एका मोनो बँकेनं यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे.

जास्तीत जास्त लोकांनी पायी चालून पायी चालणाऱ्यांची संख्या वाढावी या हेतूनं या बँकेनं व्याजदराला पावलांसोबत जोडण्याची चांगली शक्कल लढवली आहे. परंतु केवळ पायी चालणं एवढंच महत्त्वाचं नाही कारण यासाठी बँकेची एक अटदेखील आहे. ती म्हणजे तुम्हाला  दररोज कमीत-कमी 10 हजार पावलं चालावी लागणार आहेत.

जास्त व्याज देणाऱ्या या खात्यांना बँकेनं एक खास नाव दिलं आहे. या सर्व अकाऊंटला स्पोर्टस डिपॉझिट अकाऊंट असं नाव बँकेकडून देण्यात आलं आहे. या खात्यानुसार बँक ग्राहकांनी त्यांच्या मोबईल फोनमध्ये एक हेल्थ अॅप डाऊनलोड करायचं आहे. हे अॅप खातेदारांच्या शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवतो. यासर्व हालचालींचा डेटा बँकेकडे असतो. बँकेच्या अटींनुसार जो खातेदार पायी चालण्याचं लक्ष्य पूर्ण करतो बँक त्यांच्या खात्यात 21 टक्क्यांप्रमाणे जास्त व्याज जमा होतो.  इतकेच नाही तर जर कोणी  सतत 3 दिवस 10 हजार पावलं चालतं असेल तर बँक त्यांच्या खात्यामध्ये फक्त 11 टक्के व्याजदर जमा करते. सध्या या बँकेतील 50 टक्के ग्राहक 21 टक्के व्याजदर घेत आहेत.

युक्रेनमध्ये लठ्ठ असणाऱ्या माणासांची संख्या जास्त आहे. या लठ्ठपणाचे प्रमाणही गतीनं वाढत आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार 2030 पर्यंत युक्रेनमधील 50 टक्के पुरुष लठ्ठपणाचे शिकार होतील. हे लट्ठपणाचे प्रमाण करण्यासाठी बँकेची ही एक चांगली शक्कल आहे. युक्रेनची राजधानी किवमध्ये जबरदस्त थंडीचं प्रमाण आहे. सामान्य लोकांना दररोज 10 हजार पाऊलं चालणं शक्य नाही म्हणूनच बँकेनं हा व्याजदर ठेवला आहे. बँकेच्या अनेक ग्राहकांना चालणं आवडतं म्हणून ते खूश आहेत आणि या निमित्तानं त्यांचं टार्गेटही पूर्ण होते. परंतु  अनेक लोक पळवाटाही काढत असतात किंवा चिटींगही करतात. एका तपासणीनंतर युक्रेनमध्ये असेही चित्र दिसून आलं की, काही लबाड लोक या अॅपला चालू करून बँकेला फसवायचे त्यानंतर जो ग्राहक पायी चालण्याबाबत प्रमाणिक नसेल त्यांच्या व्याजदरात घट करण्याचा बँकेनं नियम केला.

मोनो बँक ही तेथील नवीन बँक आहे. महत्त्वाचे म्हणजे या बँकेची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे अवघ्या तीन वर्षात बँकेला 5 लाख ग्राहकांना जोडण्यात यश आल्याचं दिसून येत आहे.