इराणी सेनेचा ‘कबुलीनामा’ : चुकून पाडलं गेलं ‘युक्रेन’चं विमान, 176 प्रवाशांचे गेले प्राण

तेहरान : पोलीसनामा ऑनलाइन – तेहरान विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या युक्रेनचे विमान चुकून पाडण्यात आल्याची कबुली इराणच्या लष्कराने दिली आहे. या विमानामधील १७६ प्रवाशांचा मृत्यु झाला होता.

हे विमान पाडण्यात मानवी चुक होती. हे विमान क्षेपणास्त्र हल्ल्यात चुकून पाडले गेले अशी, कबुली इराणी लष्कराने दिली आहे. याबाबत इराणच्या सरकारी माध्यमाने वृत्त दिले आहे. इराणने बुधवारी इराकची राजधानी बगदाद येथील अमेरिकन दूतावासाजवळ क्षेपणास्त्राचा हल्ला केला होता. तसेच त्यांच्या विमानतळावरही क्षेपणास्त्र डागली होती.

त्याचदरम्यान युक्रेनच्या विमानाने तेहरानच्या विमानतळावरुन उड्डाण घेतले होते. या विमानात १७० प्रवासी व कर्मचारी असे १७६ जण होते. त्यात कॅनडाचे ६३ नागरिकही होते. इराणच्या लष्कराने चुकून या विमानाला लक्ष्य करीत क्षेपणास्त्र डागले. ते विमानाला धडकून विमान दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात विमानातील सर्व प्रवासी ठार झाले. अगोदर इराणने वेगवेगळी कारणे अपघातामागे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न होत नसल्याचे पाहिल्यावर शेवटी इराणी लष्कराने आपली चुक झाल्याची कबुली दिली.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/