Ulhasnagar Crime | उल्हासनगरमध्ये ऑन डयुटी असणार्‍या पोलिसावर खुनीहल्ला ! अंमलदार रक्ताच्या थारोळयात पडल्यानं परिसरात प्रचंड खळबळ (व्हिडीओ)

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ulhasnagar Crime | उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर (Ulhasnagar Crime) काही जणांनी जीवघेणा चाकू हल्ला (Knife attack on policeman) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर हा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना उल्हासनगरच्या कॅम्प-4 भागात गुरुवारी (14 ऑक्टोबर) रोजी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे (Vitthalwadi Police Station) पोलीस अंमलदार गणेश डमाले (PC Ganesh Damale) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

 

 

याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित दोन्ही पोलीस या परिसरात गस्त घालत होते. संजय शितलानी आणि नरेश लेफ्टी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या व्यवहारातून वाद होते. नरेश हा संजयकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. यामुळे अविनाश नायडू याने संजयकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रकरण मिटवण्यासाठी संजय आणि अविनाश हे मध्यरात्री नरेशला भेटण्यासाठी आले.

 

 

याठिकाणी 2 गटांमध्ये पैशावरून वाद होऊन एकमेकांवर जीवघेणा हल्ला (Ulhasnagar Crime) करत होते. दोन गटात तुंबळ हाणामारी सुरु होती. हे बघून यावेळी गस्तीवर असणारे पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड (Police Ganesh Rathore) यांनी दोन्ही गटात मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतापलेल्या हल्लेखोरांनी दोन्ही पोलीसांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात अंमलदार डमाले गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत.

 

दरम्यान, या प्रकरणी विट्ठलवाडी पोलिस ठाण्यात (Vitthalwadi Police Station) हत्तेचा प्रयत्न,
सरकारी कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
तर, आरोपींना पकडण्यासाठी 4 पथके रवाना करण्यात आली आहेत.
अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते (DCP Prashant Mohite) यांनी दिली आहे.

 

Web Title :-Ulhasnagar Crime | Murder attack on on-duty police in Ulhasnagar! Violence in the area after the officer fell in a pool of blood (video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा