Ulhasnagar Crime News | भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला; कारण ऐकून बसेल धक्का

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – उल्हासनगर (Ulhasnagar Crime News) जवळ माणेरे गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातल्या काही तरुणावर कोंबड्यांच्या डीलरशिपवरून जीवघेणा हल्ला (Attack) करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले असून सागर पाटील (Sagar Patil) गटातील अजीज शेख (Aziz Shaikh) आणि महेंद्र म्हात्रे (Mahendra Mhatre) असे जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेनंतर काही तरुणांच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जुना अंबरनाथ गावात राहणारे महेंद्र म्हात्रे आणि सागर पाटील हे कोंबड्यांच्या डीलरशिपचा व्यवसाय करतात. तर माणेरे गावात राहणारा आकाश भोईर (Akash Bhoir) देखील कोंबड्यांच्या डीलरशिपचा व्यवसाय करतो. काही दिवसांपूर्वीच माणेरे गावात कोंबड्याच्या डीलरशिपवरून आकाश भोईर आणि महेंद्र म्हात्रे, सागर पाटील यांच्यात वाद निर्माण झाला होता.

फिर्यादी महेंद्र म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल म्हणजेच 24 मार्च रोजी सकाळी 7.10 वाजताच्या
सुमारास मी आणि माझा मित्र सागर पाटील अंबरनाथ पूर्व भागात कोंबड्या पोहोचवण्याचे काम करत असताना
त्यांना सागर भोईरचा फोन आला आणि त्याने तातडीने आम्हाला बोलावून घेतले. यानंतर मी आणि मित्र अजिज दस्तगीर शेख एका मोटार सायकलवर तर सागर पाटील व कुंदन मडवी (Kundan Madvi) हे एका मोटार सायकलवर असे आम्ही सागर भोईरला भेटण्यासाठी गेलो. यादरम्यान सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मोणेरेगाव उल्हासनगर नं. 4, काजल किराणा स्टोअर्स समोर रोडवरून जात असताना सागर पाटील व कुंदन मडवी हे आमच्या पुढे निघून गेले.

यादरम्यान तिथे हातात तलवारी, लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेवून उभे राहीलेले आरोपी आकाश भोईर,
आशिश उर्फ बंटी भोईर, सुशिल भोईर, बादल वर्मा, कल्पेश आणि इतर 3 ते 4 जणांनी आमच्यावर हल्ला केला.
यानंतर आम्ही त्या ठिकाणाहून पळून जात असताना आरोपी आकाश भोईर व सुशिल भोईर यांनी
आमच्यावर तलवारीने वार केले असे महेंद्र म्हात्रे याने सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा
दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Web Title :- Ulhasnagar Crime News | Fatal attack on youth in Bhar road; You will be shocked to hear the reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | ‘राहूल गांधींना ‘त्या’ जेलमध्ये ठेवलं पाहिजे अन् घाण्याला जुंपलं पाहिजे’, सावरकरांच्या विधानावरुन मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

Former MLA Harshvardhan Jadhav | ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करताच हर्षवर्धन जाधवांनी दंड थोपटले, दानवे बाप-लेकीच्या विरोधात निवडणूक लढवणार