रोटरी मिक्स विंटर कप क्रिकेट 2021 स्पर्धेत अल्टीमेट ऍडव्हेंचर्स संघाचा लवास रॉयल्स संघावर सनसनाटी विजय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रोटरी डिस्ट्रिक 3131 यांच्या तर्फे आयोजित रोटरी मिक्स विंटर कप क्रिकेट 2021 स्पर्धेत गटसाखळी फेरीत शेखर दालमिया(38धावा व 1-36)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अल्टीमेट ऍडव्हेंचर्स संघाने लवास रॉयल्स संघाचा  30 धावांनी पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. आरएस खांदवे येथील क्रिकेट मैदान व लिजेंड्स क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत अ गटाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शेखर दालमिया 38, गणेश कुदळे 34, शिरीष भोपे 29, विजय कोतवाल नाबाद 26 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर अल्टीमेट ऍडव्हेंचर्स संघाने 15 षटकात 4 बाद 154 धावा केल्या.

याच्या उत्तरात लवास रॉयल्स संघाने 15 षटकात 6 बाद 124 धावा केल्या. यात प्रीतम खैया 37, जयंत येवले 30, दर्शन वनगे 15 यांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. अल्टीमेट ऍडव्हेंचर्स संघाकडून दिलीप मॅथ्यू(2-20), महेश दिवटे(1-12), भरत पुनुमिया(1-17), शेखर दालमिया(1-36)यांनी अफलातून गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी शेखर दालमिया ठरला. दुसऱ्या ब गटाच्या सामन्यात बाश्री ब्लास्टर्स व कु-बिल्ट मास्टर्स यांच्यातील सामना अनिर्णित राहिला व त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. पहिल्यांदा खेळताना बाश्री ब्लास्टर्स संघाने 15 षटकात 119 धावावर संपुष्टात आला.

यामध्ये निलेश देशमुख 25, प्रमोद पालीवाल 15, देवा देशपांडे 19, सिकंदर पाटील 12 यांनी धावा केल्या.  कु-बिल्ट मास्टर्सकडून विक्रम खैया(3-20), मितेश पतंगे(1-10), संतोष जाधव(1-11) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात कु-बिल्ट मास्टर्स संघाला 15षटकात 119 धावाच करता आल्या. यात पंकज पाटील 26, देवेंद्र चौधरी 21, विक्रम खैया 13 यांनी धावा केल्या. बाश्री ब्लास्टर्स संघाकडून ज्ञानेश्वर झेंडे(2-26), जयंत म्हात्रे(2-14), प्रमोद पालीवाल(2-26) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून कु-बिल्ट मास्टर्सला बरोबरीत रोखले. सामन्यात उत्कुष्ट कामगिरी करणाऱ्या ज्ञानेश्वर झेंडे याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.