खुशखबर ! आता रिटेलर्स आपल्याला ‘उल्‍लू’ बनवू शकणार नाही, UMANG APP नं घर बसल्या जाणून घ्या सर्व औषधांच्या योग्य ‘किंमती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उमंग अ‍ॅपच्या सहाय्याने आपल्या घरातील काही महत्वाची कामे केली जाऊ शकतात तसेच अनेक आवश्यक माहिती देखील यावर उपलब्ध आहे. उमंग अ‍ॅप देशातील 19 राज्ये आणि 77 विभागांकडून 413 प्रकारच्या सेवा प्रदान करते. हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी फक्त 97183-97183 वर मिस कॉल द्यावा लागतो.

या अ‍ॅपच्या द्वारे अनेक सुविधा मिळतील. उदा. या अ‍ॅपद्वारे महत्वाच्या कागदपत्रांना डिजिटल माध्यमात सुरक्षित ठेवण्यासाठी DigiLocker ची सेवा घेऊ शकता.

My PAN Service घरबसल्या पॅन कार्डची माहिती अपडेट करता येते. उमंग अ‍ॅपची सर्वात महत्वाची सुविधा म्हणजे औषधांविषयी मिळणारी माहिती.
Umang App
अशी मिळवा माहिती –
कोणत्याही औषधाची माहिती मिळवण्यासाठी ‘फार्मा सही दाम’ सेवेचा वापर करा. त्यानंतर सर्च मेडिसिन बॉक्समध्ये औषधाचे नाव टाका. औषधाचे नाव टाकल्यावर त्याबाबतचा सर्व तपशील मिळेल. त्यामुळे कोणताही रिटेलर, दुकानदार तुमची फसवणूक करू शकणार नाही. या अ‍ॅपवर केवळ माहितीच मिळत नाही तर एखादा दुकानदार तुमची फसवणूक करत असेल तर त्याविरुद्ध तक्रार देखील कंज्यूमर कोर्टात दाखल करू शकता.