3 वर्षानंतर संघात कमबॅक करणार्‍या खेळाडूनं केला लाजिरवाणा ‘विक्रम’

लाहोर : वृत्तसंस्था – श्रीलंका पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या ट्वेंटी-20 सामन्यात उमर अकमल शून्यावर बाद झाला. तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय संघात कमबॅक करणाऱ्या अकमलने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 10 वेळा शून्यावर बाद होणाच्या श्रीलंकेचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याच्या या खराब कामगिरीमुळे त्याचे चाहते त्याच्यावर संतापले आहेत.

अकमलला पाकिस्तानकडून सप्टेंबर 2016मध्ये अखेरचा ट्वेंटी-20 सामना खेळण्याची संधी मिळाली होती. तीन वर्षानंतर त्याने आंतरराष्ट्रीय संघात कमबॅक केले मात्र लंकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत पहिल्याच चेंडूवर भोपळा न फोडताच माघारी परतावे लागले. त्याच्या या खराब कामगिरीमुळे नेटिझन्सने त्याला ट्रोल केले आहे. काहींनी त्याला आपल्याच संघासाठी घातक म्हणून संबोधले आहे.

https://www.instagram.com/p/B3VQ5nKAb7-/?utm_source=ig_web_copy_link

तर काहींनी अकमलचे शतक केवळ 100 रानांनी हुकले असे म्हंटले आहे.

श्रीलंका पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या सामन्यात श्रीलंकेने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 182 धावा केल्या. श्रीलंकेच्या 6 बाद 182 धावांचा पाठलाग करताना पाकचा संपूर्ण संघ 147 धावांत ऑल आऊट झाला.

Visit : Policenama.com