देशद्रोहाचा आरोप असलेला जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद झाला डॉक्टर

नवी दिल्ली : कन्हैया पाठोपाठ आता देशद्रोहाचा आरोप असलेला जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद देखील डॉक्टर झाला आहे. त्याने नुकतीच पीएचडी पूर्ण केल्याची माहिती ट्विटरवरून दिली. डॉक्टर झाल्याची माहिती देण्याबरोबरच उमरने मोदींवर निशाना साधला आहे. ‘मोदी साहेब, मी तर टॅक्सपेयर्सचा हिशोब चुकता केला, तुम्ही केलात का?’ असा टोमणा त्याने मोदींना लगावला आहे. पीएचडी पूर्ण झाल्याबद्दल उमरने डॉक्टर संगीता सेनगुप्ता, प्राध्यापक प्रभु महापात्रा आणि प्राध्यापक रोहन यांचे विशेष आभार मानले आहेत.

दिल्ली पोलिसांनी जेएनयू प्रकरणात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये १० लोकांना मुख्य आरोपी बनवले आहे,त्यामध्ये उमर खालिदच्या नावाचा समावेश आहे. याबरोबरोबरच कन्हैया कुमार, अनिर्बान भट्टाचार्य या नावांचा देखील चार्जशीटमध्ये समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील चार्जशीटमध्ये व्हिडीओ फुटेज आणि १०० पेक्षा जास्त साक्षिदारांच्या साक्षीचा समावेश केला आहे.

फेब्रुवारीत कन्हैय्या झाला होता डॉक्टर

१४ फेब्रुवारिला कन्हैय्याकुमारने असेच ट्विट करून पीएचडी पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. तो म्हणाला होता कि आज पीएचडी पूर्ण झाल्याचा आनंद तुमच्या सर्वांसोबत मला साजरा करायचा आहे. त्या सर्व लोकांचा मी आभारी आहे ज्यांनी मला माझ्या संघर्षाच्या काळात साथ दिली आता मी अधिकृतरीत्या डॉक्टर झालो.

Loading...
You might also like