पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पावसाळ्यात छत्रीची गरज लक्षात घेऊन नागरिकांच्या (Citizen) सोयीसाठी छत्री (Umbrella) मोफत दुरुस्त करुन देण्याचा उपक्रम पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने (Pune City District Congress Committee) हाती घेतला असून त्याचा शुभारंभ सोमवार दिनांक १४ जून रोजी दुपारी दोन वाजता काँग्रेस भवन (Congress Building) येथे करण्यात येईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी दिली.

हा उपक्रम सोमवार दिनांक १४ जून पासून शुक्रवार दिनांक १८ जूनपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळात काँग्रेस भवनात चालू राहील. छत्री दुरुस्तीसाठी (Umbrella repair) कारागीर नेमण्यात आलेले आहेत. तसेच गरजेनुसार शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये (Assembly constituency) कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम यापुढेही राबविला जाईल, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

पावसाळ्यात छत्रीची गरज असते मात्र, अनेकदा छत्री मोडते आणि तिच्या दुरुस्तीसाठी कारागिरांची शोधाशोध करावी लागते. नादुरुस्त छत्री टाकून देणे परवडत नाही अशावेळी मोठी पंचाईत होते. याकरिता नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करुन देण्याचा उपक्रम काँग्रेस पक्षातर्फे (Congress) हाती घेण्यात आला आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे.

Wab Title :- Umbrella free repair activities by Pune City Congress

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा