रेखा जरे हत्याकांडात उमेशचंद्र यादव पाटील विशेष सरकारी वकील

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडात शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली आहे. रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती.

या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तरीही तो पोलिसांनी सापडलेला नाही. शेवटी आता न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे.

अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांनी यापूर्वी अनेक संवेदनशील खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्यात यादव यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. तसेच कोपर्डी हत्याकांड खटला उच्च न्यायालयात चालविण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.