‘त्या’ वायरमनच्या आत्महत्येप्रकरणी दाभेकरला अटक

पुणे पोलीसनामा ऑनलाईन – सावकारी जाचाला कंटाळून दोघांची नावे चिठ्ठीत लिहून धायरीतील वायरमनने आत्महत्या केली होती. सिंहग़ड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उमेश दाभेकर याला अटक केली आहे. तर एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

यशवंत हरिभाऊ  पवार (वय ५४ ,रा. रायकर मळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पवार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उमेश राघोबा दाभेकर (वय ५१) आणि शोभा विठ्ठल कुडले (वय ५३,दोघे रा. नारायण पेठ) यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियमा अंतर्गत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांची पत्नी रोहिणी यांनी यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर सिंहगड पोलिसांनी उमेश दाभेकरला अटक केली आहे.

माझ्या पतीने उमेश दाभेकर आणि शोभा कुडले यांच्याकडून पैसे व्याजाने घेतले होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी किटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकऱणी तपास केला त्यात पवार यांनी दोघांकडून पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर चौकशी केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हनमंत ननावरे तपास करत आहेत.

असा घडला होता प्रकार

यशवंत पवार हे वायरमन असून ते कंत्राट घेऊन कामे करत होते. पवार यांनी आपल्या पत्नीला आपण आत्महत्या करणार असल्याचे गुरुवारी दुपारी २ वाजता पाठवले होते. नंतर त्यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन रोगर हे विषारी औषध पिले़. दरम्यान पत्नी कामावर गेलेल्या असल्याने त्यांनी सायंकाळी पाच वाजता त्यांनी पतीचा मेसेज पाहिला.

मेसेज पाहिल्यावर त्यांनी पतीला शोधण्यास सुरुवात केली. दरम्यान डोंगराच्या भागातून जाणाऱ्या दोन तरुणांना एक मोटारसायकल आढळून आल्याने त्यांनी आसपास पाहिले़ तेव्हा पाण्याच्या टाकीवर यशवंत पवार हे बेशुद्धावस्थेत त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले़. त्यांनी त्यांची तपासणी केली़ तेव्हा त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली़च त्यात पवार यांच्या नातेवाईकांचे फोन नंबरही होते़. त्यांनी नातेवाईकांना बोलावून घेऊन खात्री केली़.

पवार यांना ससून रुग्णालयात पाठवून दिले. पवार यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत आपण दाभेकर व कुडले यांच्या सावकारीला कंटाळून या दोघांनी माझ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आणली आहे़ त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत लिहिले होते.