‘अंदरबाहर’ खेळणारे ‘अंदर’ ! घोरपडी बाजारातील उमेश साळुंखेच्या जुगार अड्ड्यावर धाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडी बाजार येथील जयहिंद चौकात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घातला. तेथे अंदरबाहर जुगार खेळणाऱ्या  १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसापासून शहर पोलीस दलाने शहरात सुरु असलेल्या जुगारांच्या अड्ड्यावर छापा घालण्यास सुरुवात केली आहे. खडकी, वानवडी येथील मोठ्या जुगार अड्ड्यावर छापे घालून पोलिसांनी एकाचवेळी अनेकांना पकडले होते.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे व त्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री घोरपडी बाजार येथील उमेश साळुंखे यांच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. तेथे १६ जण अंदरबाहर जुगार खेळताना दिसून आले. त्यांनी जुगारात लावलेले ५८ हजार ७०० रुपये व जुगाराचे साहित्य, मोबाईल असा ६४ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चांदगुडे, पोलीस उपनिरीक्षक खडके, पोलीस नाईक पठाण, माने, खाडे, चव्हाण, कांबळे यांनी मुंढवा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली.

शहरात अवैध धंदे बंद असल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून करीत होते. आता पोलिसांच्याच कारवाईने हे धंदे रितसर सुरु असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like