टेनिस स्टार रॉजर फेडररची सर्वासमोर ‘बोलती’ बंद, ‘या’ सुंदर अंपायरचे ‘दीवाने’ झाले फॅन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्बियन टेनिस स्टार रोजर फेडरर कोर्टामध्ये उतरताच प्रेक्षकांची नजर त्यांच्यावर जाते. परंतु मंगळवारी फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनचा उपांत्यपूर्व सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला तेव्हा प्रेक्षकांच्या नजरा दुसरीकडेच वळल्या. मंगळवारी रॉजर फेडरर आणि टेनिस सँडग्रेन यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यात मेरिआना वेल्जोविक या अंपायरकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

मेरियानाने तिच्या सौंदर्याने स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली, तसेच सामन्यादरम्यान फेडररला खडसावल्यानंतर अधिक चर्चा होऊ लागली. सामन्यात दुसरा सेट गमावल्यानंतर फेडररच्या तोंडातून काही शिव्या येऊ लागल्या. जेव्हा लाइनच्या मागे उभे असलेल्या जजने मेरियानाकडे तक्रार केली तेव्हा तिने फेडररला स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या.

marijana veljovic2

मेरियानाने फेडररला इशारा केला कि, “फेडरर, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणार नाही. हे अगदी स्पष्टपणे समजून घ्या’. मेरियाना देखील फेडररच्या देश सर्बियाची नागरिक आहे. कॅनेडियन टेनिसपटू युगिनी बुचार्डने स्वतः ट्विट करुन मेरियानाच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. युगिनीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “रोजर-टेनिस यांच्यात खेळल्या जाणार्‍या सामन्यात अंपायर खूपच सुंदर आहेत”. आता वेल्जोविकची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार शेअर केले जात आहेत.

सौंदर्याबरोबरच वेल्जोविकच्या धैर्याचीही चर्चा सर्वत्र होत आहे. क्वार्टर फायनल सामना संपल्यानंतर चाहते रोजर फेडररचे कौतुक करीत आहेत, परंतु गुगल सर्चमध्ये अंपायर मेरियाना वेल्जोविकचे नाव सर्वात वरचेवर ट्रेंड होत आहे. गोल्ड बॅज हा टेनिस चेअर अंपायर आहे. मेरियाना हिने अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. सर्बियन भाषेव्यतिरिक्त मारियानाला स्पॅनिश, इटालियन आणि इंग्रजी भाषेचेही चांगले ज्ञान आहे. मेरियानाने 8 वेळा विम्बलडनमध्ये अम्पायरची भूमिका बजावली आहे.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like