तालिबान आणि अलकायदामध्ये जवळचे संबंध, 19 वर्षांच्या मोठ्या लढाईनंतर अमेरिकेने केला होता शांततेचा करार, संयुक्त राष्ट्र रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

इस्लामाबाद : अफगाणिस्तानमध्ये सक्रिय तालिबानने अमेरिकेशी केलेल्या शांती करारात दहशतवादी संघटनांशी लढण्यासाठी वचनबद्धता दर्शवली आहे. परंतु, अलकायदाच्या दहशतवादी नेटवर्कशी त्याचे अजूनही जवळचे संबंध आहेत.

हा खुलासा संयुक्त राष्ट्रद्वारा मंगळवारी जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये झाला आहे. कतारमध्ये यावर्षी फेब्रुवारीत अमेरिका आणि तालिबानने एक करार झाला. ज्यामध्ये 19 वर्षांच्या दिर्घ लढाईनंतर अमेरिकन सैनिकांच्या अफगाणिस्तानमधून परतीसह देशाचे राजकीय भविष्य ठरवण्यासाठी अफगाणिस्तानच्या विविध गटात चर्चेचा मार्ग बनवण्याची तरतूद आहे.

करारात तालिबानने अलकायदासह दहशतवादी गटांशी सामना करण्याचे वचन दिले आहे, ज्यांना ते कधी आश्रय देत होते. करारात अफगाणिस्तानच्या भूमीचा अमेरिकेविरूद्ध हल्ल्यासाठी वापर न करण्याचे वचन आहे. दहशतवादाच्या विरूद्ध तालिबानच्या वचनबद्धेलाही जाहीर करण्यात आले नाही. अमेरिकेचे शांतीदूत तसेच कराराचे शिल्पकार जलमी खलीलजाद यांनी म्हटले की, हे लागू करण्याच्या गुप्त ऑपरेशनच्या सुरक्षेसाठी गोपनीयता जरूरी आहे.

हा रिपोर्ट तयार करणार्‍या संयुक्त राष्ट्र समितीने म्हटले की, अलकायदाचे अनेक मोठे दहशतवादी मागील महिन्यांमध्ये मारले गेले, परंतु आताही संघटनेचे अनेक प्रमुख दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये आहेत. ओसामा बिन लादेन एकेकाळी अलकायदाचा प्रमुख होता. रिपोर्टनुसार अलकायदाचा तालिबानचा सहकारी हक्कानी नेटवर्कशी संबंध आहे आणि तालिबान दहशतवादी कारवायांमध्ये अजूनही महत्वाच्या भूमिका पार पाडत आहे. संयुक्त राष्ट्रच्या रिपोर्टनुसार जिहाद आणि एकच इतिहास दोन्ही दहशतवादी संघटनांना जोडत आहे.

संयुक्त राष्ट्रच्या रिपोर्टवर तालिबानकडून कोणतीही तात्काळ प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु अमेरिका-तालिबान कराराच्या टीकाकारांनी या अस्पष्ट करारावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच इशारा दिला आहे की, तालिबानच्या सदस्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे अवघड झाले आहे. वॉशिंग्टन येथील विल्सन सेंटरचे आशिया कार्यक्रमाचे उपसंचालक मायकल कुगेलमॅन यांनी म्हटले की, अनेक समस्यांमध्ये एक समस्या ही आहे की, तालिबानकडून दहशतवादविरोधी कारवाईची मागणी खुपच अस्पष्ट आहे.

ते म्हणाले, करारात अलकायदाचा उल्लेखसुद्धा करण्यात आलेला नाही. कुगेलमॅन यांनी म्हटले अमेरिकेने कमीतकमी मागणी केली पाहिजे होती की तालिबान अलकायदासारख्या मोठ्या दहशतवादी संघटनांशी संपर्क संपुष्टात आणेल. संयुक्त राष्ट्रच्या रिपोर्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट (आयएस) च्या विरूद्ध लढाईत तालिबानच्या योगदानाला अधोरेखित केले आहे.

विशेष म्हणजे आयएस खुपच आक्रमक झाला आहे आणि अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये अनेक मोठे हल्ले त्यांनी केले आहेत. असे म्हटले जाते की, काबुलमधील प्रसुती हॉस्पिटलवरील हल्ल्यात आयएसचा हात होता, ज्यामध्ये 24 लोक मारले गेले होते. मृतांमध्ये बहुतांश तरूण बाळंत महिला आणि दोन नवजात बालके होती.