IAS ‘वर’ आणि IPS ‘वधू’ला मिळत नव्हता ‘वेळ’, ऑफिसमध्येच उरकलं ‘लग्न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या एका आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. असेही सगळ्यांनीच आपल्या लग्नाविषयी प्रचंड स्वप्नं रंगवलेली असतात. आपल्या लग्नात इतरांपेक्षा वेगळं काय करता येईल याचाच विचार बऱ्यापैकी जोडपी करत असतात. मात्र एका अधिकारी जोडप्यानं एक आगळं वेगळं लग्न केलं आहे.

आयएएस अधिकारी तुषार सिंगला यांनी आपली प्रेयसी आयपीएस नवजोत सिम्मी यांच्याशी ऑफिसमध्येच लग्न केलं आहे. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे विवाहासाठी त्यांना वेळ भेटत नसल्याने त्यांनी व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधून ऑफिसमध्येच रजिस्टर पद्धतीने झटपट लग्न केलं आहे.

Geplaatst door Tushar Singla op Vrijdag 14 februari 2020

आयएएस अधिकारी तुषार सिंगला हे २०१५ च्या बॅचचे पश्चिम बंगाल केडरचे अधिकारी आहेत. तर आयपीएस अधिकारी नवजोत सिम्मी या २०१७ बॅचच्या बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. तुषार सिंगला हे सध्या उलुबेरियामध्ये एसडीओ म्हणून काम पाहत आहेत. तर नवजोत सिम्मी या पाटण्यामध्ये डीएसपी म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान नवजोत या लग्नासाठी पाटण्याहून बंगालला आल्या होत्या.

तुषार आणि नवजोत हे पंजाब येथील रहिवासी आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र विविध अडथळ्यांमुळे त्यांना विवाहबद्ध होता आले नाही. त्यांच्या व्यस्त असणाऱ्या शेड्युलमुळे त्यांना वेळ काढणे फार कठीण जात होते. अखेर त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी वेळात वेळ काढला आणि ऑफिसमध्येच विवाहबंधनात अडकले. यापुढे एकत्र राहता यावे यासाठी दोघे केडर बदलणार असल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान या झटपट झालेल्या लग्नामुळे त्यांच्या मित्रमंडळींना लग्नाला येता आले नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमधील २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांना लग्नाची पार्टी देण्यात येणार आहे असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

You might also like