Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Unauthorized School in Pune | महाराष्ट्रातील तब्बल 674 शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामधील 22 शाळा या पुण्यातील (Unauthorized School in Pune) असल्याचे समजते. या अनधिकृत शाळांच्या याद्या आता शिक्षण विभागाच्या (Department of Education) हाती लागले आहे. 674 शाळेने शासनाची कोणतेही परवानगी घेतलेली नाही. दरम्यान, सोमवारी संबंधित शाळांची नावे जाहीर करून त्यांना कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावण्यात येणार आहे.

 

कोणत्याही भौतिक सुविधा नसल्याने दुसऱ्या ठिकाणी राज्य मंडळाची (Maharashtra State Board) 12 वीची परीक्षा घेणाऱ्या 14 शाळांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पूर्ण केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असणा-या पुण्यातील 22 शाळा अनधिकृत (Unauthorized School in Pune) असल्याचे समोर आले आहे. अशा पद्धतीचे परवानगी न घेता अनेकांनी अनधिकृत शाळा सुरु करुन आपली घरे भरण्याचं काम केलं आहे. शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहणाऱ्या आणि शासनाची कोणतीही परवानगी न घेता राजरोसपणे अनधिकृत शाळा सुरू करून विद्यार्थी व पालकांची फसवणूक करणाऱ्या शाळांना आता कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, शासनाचे परवानगी आदेश व ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (No Objection Certificate) प्राप्त झाल्याशिवाय कोणालाही शाळा सुरू करता येत नाही तसेच अनधिकृतरित्या शाळा सुरू ठेवल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनाला 1 लाख रुपये दंड आणि शाळा बंद करण्याच्या सूचना देऊनही शाळा सुरू ठेवल्यास 10 लाख रुपये प्रति दिवस दंड ठोठावण्यात यावा, असं सांगितलं आहे.

 

शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले की, ”कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्यांच्याच शाळेत घेण्यात आल्या.
त्यावेळी अनेक शाळांकडे भौतिक सुविधा नसल्याचे समोर आले.
म्हणून या 14 शाळांची मान्यता काढण्याची प्रक्रिया सुरू केलीय.
त्यामध्ये 6 शाळांची सुनावणी पूर्ण झालीय, सोमवारी ४ शाळांची सुनावणी होणार असल्याने
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी त्यांची मान्यता काढली जाईल.”

पुणे विभाग शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे (Audumbar Ukirade) म्हणाले,
”शिक्षण अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात २२ अनधिकृत शाळा असल्याचे समोर आले.
या शाळांची यादी सोमवारी प्रसिद्ध केली जाणार असून संबंधित शाळांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.”

 

Web Title :- Unauthorized School in Pune | 22 unauthorized schools in pune city 14 junior colleges will be recognized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा