‘वैताग’लेला जवान अखेर ‘बोलला’ ; म्हणाला, ‘आमच्या बायकांना बडया अधिकार्‍यांसमोर नाचावं लागतं’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन : देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी जीवाची परवा न करता शत्रूचा सामना करत जवान सीमेचे रक्षण करत असतात. कर्तव्य निभावत असताना त्यांना घरापासून लांब राहावे लागते. कित्येक दिवस कुटुंबियांची भेट होत नाही. अशा अनेक संकटांचा सामना करत असताना त्यात अजून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास देखील जवानांना सहन करावा लागतो. जवानांना तर त्रास सहन करावा लागतोच पण आता जवानांच्या पत्नींचा देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप एका जवानाने केला आहे. आम्ही सीमेवर गेल्यावर आमच्या बायकांना मोठ्या अधिकाऱ्यांसमोर नाचावं लागतं’ असा आरोपदेखील या जवानाने केला आहे.

जवानांच्या पत्नींना नोकराची वागणूक

या जवानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याने गंभीर आरोप केले आहेत. जवानाने म्हंटले आहे की, ‘जेव्हा आम्ही सीमेवर कर्तव्य निभावण्यासाठी तैनात असतो. तेव्हा बळजबरीने आपल्या कुटुंबाला कुटुंब कल्याण केंद्रात ठेवावं लागतं. तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बायका आमच्या पत्नींना नोकर असल्यासारखी वागणूक देतात. अधिकाऱ्यांकडून आमच्या कुटुंबाचं शोषण केलं जातं. त्यांचा अपमान केला जातो. तसेच त्या आमच्या पत्नींना वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर नाचायला देखील लावतात आणि त्यांची थट्टा करतात.’

एवढेच नाही तर अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून नेहमीच त्यांना चुकीची वागणूक मिळते. कँटीन मधून काही सामान घ्यायचे असेल किंवा आरोग्य तपासणी करताना अपमान केला जातो. आर्मीच्या ड्रेसमध्ये असणाऱ्या आम्हा जवानांना घरातलं काम करावं लागतं. एका अधिकाऱ्याच्या घरी २०-२५ जवान हे फक्त घरचे काम करण्यासाठी असतात.

एक अौर तेज बहादुर मैदान मे आगया मोदी जी की धोती फाडने के लिए भगतो संभालो अब इसको भी पाकिस्तान का टिकट देदो

Geplaatst door Rais Mensi op Zaterdag 18 mei 2019

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like