जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – M-Yoga App |आंतरराष्ट्रीय योग दिवसा (International Yoga Day) निमित्त देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी एम योगा अ‍ॅप (M Yoga App) ची घोषणा केली आहे. या अ‍ॅपद्वारे जगभरातील वेगवेगळ्या भाषांमध्ये योग शिकविला जाणार आहे. भारताने हे अ‍ॅप जागतिक आरोग्य संघटने (World Health Organization) च्या सहयोगाने तयार केले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जेव्हा भारताने युनाइटेड नेशन्समध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामागे योग विज्ञान संपूर्ण जगासाठी सुलभ व्हावे. या अ‍ॅपमध्ये कॉमन योग प्रोटोकॉलच्या आधारे योग प्रशिक्षणाविषयी अनेक व्हिडिओ जगभरातील विविध भाषांमध्ये उपलब्ध असतील. याद्वारे एक विश्व एक आरोग्य हा हेतू यशस्वी करण्यात आम्हाला मदत होईल, असे ते म्हणाले.

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नेहमीच योग विषयक व्हिडिओ जारी केले जातात. मोदी यांचे ३ डीमधील योगाचे व्हिडिओ प्रसारित झाले आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी योग लोकांमध्ये अंतर्गत शक्तीचे स्त्रो बनले आणि आपण कोरोना विरुद्ध लढु शकतो, असा विश्वास योगाने लोकांमध्ये निर्माण केल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

जेव्हा कोविड उदयाला आले, तेव्हा कोणताही देश त्याविरुद्ध लढण्यास तयार झाला नव्हता. यावेळी योग लोकांची आंतरिक सामर्थ्याचा स्त्रोत बनला.
योग आत्म शिस्त लावण्यास मदत करतो. यामुळे लोकांमध्ये या विषाणुशी लढा देण्याचा त्यांचा विश्वास वाढला.
फ्रंटलाईन योद्धांनी मला सांगितले की या विषाणुशी लढा देताना त्यांनी योगाला एक साधन केले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel :  uncategorized pm narendra modi announces m yoga app says it will help in achieving one world one health

 

हे देखील वाचा

 

PM Kisan Sanman Nidhi | 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास 4,000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या कसे

Pune Crime Branch | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-2 ची कामगिरी