Uncleaned Teeth Risk | दात स्वच्छ न केल्याने हृदय-मनोविकारांनाही निर्माण होतो धोका; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Uncleaned Teeth Risk | शरीराचे एकूण आरोग्य चांगले राखण्यासाठी तोंडांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक मानले जाते. तोंड, दात, हिरड्या आणि जीभ तसेच शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्याची सवय, आपल्याला हृदय आणि मानसिक विकारांच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवते (Oral health). संशोधनात असे आढळून आले की, जे लोक नियमितपणे ब्रश करत नाहीत त्यांना दात किडणे आणि हिरड्यांच्या समस्येचा धोका वाढू शकतो. तसेच हृदयरोग आणि स्मृतिभ्रंश यासारख्या मानसिक आजारांचा धोका वाढू शकतो (Uncleaned Teeth Risk).

 

तोंड स्वच्छ न ठेवल्यास अनेक प्रकारचे जीवाणू वाढू शकतात. म्हणूनच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी नियमितपणे घेणे आवश्यक ठरते (Uncleaned Teeth Risk). सकाळी आणि संध्याकाळी ब्रश करण्याची आणि काहीतरी खाल्ल्यानंतर लगेच चांगले स्वच्छ धुवा, असा सल्ला नेहमी डॉक्टरांकडून दिला जातो. मौखिक अस्वच्छतेमुळे हृदय आणि मनोविकार कसे होऊ शकतात याविषयी अधिक सविस्तर जाणून घेऊया (Let’s Know How Oral Hygiene Can Cause Heart And Mind Disorders).

 

दात स्वच्छ करणे का महत्वाचे (Why It Is Important To Clean Your Teeth) :
तोंडात सतत लाळ तयार होते, ज्यामुळे अनेक प्रकारच्या जीवाणूंना वाढण्यासाठी अनुकूल वातावरण असते. तोंडाची योग्य स्वच्छता न केल्यास बॅक्टेरिया वेगाने वाढण्याचा आणि अनेक प्रकारचे तोंडी संक्रमण होण्याचा धोका उद्भवू शकतो. खाल्ल्यानंतर अन्नाचे काही भाग दात आणि हिरड्यांमध्ये अडकतात, ते नीट साफ केले नाहीत तर दात किडण्याचा आणि हिरड्यांचा आजार (Tooth Decay And Gum Disease) होण्याचा धोका वाढतो.

 

गंभीर परिस्थितीत, दात काढण्याची आवश्यकता पडू शकते. म्हणूनच नियमितपणे तोंड साफ करत राहणे आवश्यक आहे. यामुळे कोणत्या प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात जाणून घेऊया.

डिमेंशियाचा धोका (Risk Of Dementia) –
अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, जे लोक दात चांगले साफ करत नाहीत त्यांना दात किडणे आणि हिरड्यांचा त्रास यासह मनोविकार होण्याचा धोका देखील असू शकतो.

 

संशोधकांना असे आढळले आहे की दात खराब होण्याची समस्या डिमेंशिया असलेल्या लोकांमध्ये सामान्य आहे. यासंबंधित न्यूरोलॉजी आणि न्यूरोसायन्स (Neurology And Neuroscience) रिपोर्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, दात किडण्याच्या अवस्थेमुळे काही लोकांमध्ये डिमेंशियाचा धोका वाढू शकतो. पीरियडोन्टायटीस रोग आणि मेंदूतील जळजळ यासारख्या दंत समस्यांमध्ये एक संभाव्य दुवा सापडला आहे ज्यामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका उद्भवू शकतो.

 

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका (Risk Of Cardiovascular Disease) :
दुसर्‍या अभ्यासामध्ये, संशोधकांना असे आढळले आहे की, तोंडी अस्वच्छता, विशेषत: दंत स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवू शकते.
युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीच्यामध्ये प्रकाशित झालेल्या संबंधित अभ्यासात शास्त्रज्ञांना असे आढळले आहे
की, जे लोक दिवसातून कमीतकमी तीन वेळा दात घासतात त्यांना एट्रियल फायब्रिलेशन आणि हृदय अपयश यासारख्या गंभीर आणि जीवघेणा समस्या उद्भवण्याचा धोका कमी असतो.
अभ्यासामध्ये असेही आढळले आहे की, ज्या लोकांनी जास्त दात काढले आहेत
त्यांना एट्रियल फायब्रिलेशन (Atrial Fibrillation) आणि इतर हृदयरोगाचा धोका जास्त असू शकतो.

दात नियमितपणे स्वच्छ करा (Brush Your Teeth Regularly) :
दात आणि तोंडाची सतत स्वच्छता करण्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, याचा परिणाम आपल्या एकूण आरोग्यावर होऊ शकतो,
असे संशोधकांचे म्हणणे आहे. जर तुम्ही एकावेळी दात घासायला विसरलात तर घाबरून जाऊ नका.
परंतु दिवसातून कमीतकमी दोनदा ब्रश करणे लक्षात ठेवा. बाजारात अनेक प्रकारचे केमिकल माउथवॉश उपलब्ध आहेत,
त्यांच्या अतिवापरामुळे दातही खराब होऊ शकतात. हलक्या कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करणे सर्वात फायदेशीर मानले जाते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Uncleaned Teeth Risk | uncleaned teeth and health risk how it may cause heart and mental health risk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Relationship Tips | मुलांच्या ‘या’ कृत्याचा मुली करतात जबरदस्त तिरस्कार, जातात दूर; जाणून घ्या

 

Green Chilli Benefits | वजन कमी करण्यासाठी हिरवी मिरची करते मदत; जाणून घ्या

 

Yoga Asanas For Hormonal Imbalance | हार्मोन असंतुलनामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात; ‘या’ आसनांच्या मदतीने मिळू शकतात फायदे