धक्कादायक ! अल्पवयीन मुलानं केला विवाहीत महिलेवर बलात्कार, सोशल मीडियावर अपलोड केला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाईन : – एका अल्पवयीन मुलाने विवाहित महिलेवर बलात्कार करून त्या कृत्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर(under-age-boy-rapes-woman-uploads-video-on-social-media) अपलोड केला. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील सादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या सासू-सासऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला घराबाहेर काढले आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे.

बलात्काराची ही घटना पाच महिन्यांपूर्वी घडली. पण महिला त्यावेळी याबद्दल काहीही बोलली नाही. पण आता व्हायरल व्हिडीओमुळे जेव्हा पीडित महिलेला अपमानित करुन घराबाहेर काढण्यात आले, तेव्हा तिने पोलिसांची मदत मागितली. महिलेने सादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताना तिच्यासोबत काय घडले ? ती सर्व माहिती दिली आहे. आम्ही या प्रकरणी तपास करत आहोत. आरोपी फरार असून त्याला लवकरच अटक करु असे सादर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. पीडित महिला आता तिच्या आई-वडिलांसोबत राहते. ज्या मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट केला आहे तो, मोबाइल पोलीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आयएएनएस वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.