‘रेजर’चा वापर करताना अनेक ‘टीनएजर्स’ मुली करतात ‘या’ चुका, जाणून घ्या योग्य पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन – वयात येताना टीनएजर्स मुलींमध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. तसेच त्यांना एक कॉमन समस्येचा सामना करावा लागतो. ती म्हणजे नको असलेले केस. यासाठी अनेक मुली रेजरचा वापर करतात आणि अंडरआर्म्स शेव्ह करतात. यामुळं स्किन काळी पडते आणि केसही दाट होतात. पहिल्यांदा रेजरचा वापर करण्याची योग्य पद्धत त्यांना माहित नसते. याच विषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

‘ही’ आहे योग्य पद्धत

1) मल्टीब्लेड रेजर – असं रेजर वापरणं टाळायला हवं. यामुळं त्वचेला चिकटून असणारे केसही कापले जातात. यामुळं त्वचेच्या आत इनग्रोन हेअर येण्याचा धोका जास्त वाढतो.

2) धार खराब झालेलं रेजर- असं रेजर अजिबात वापरून नका. शार्प रेजर आणि इलेट्रीक ट्रीमरचा वापर तुम्ही करू शकता. रेजर त्वचेर नीट काम करत नसेल तर समजून घ्या रेजर बदलण्याची वेळ आली आहे.

3) गरम पाणी – अंडरआर्म्स शेव्ह करताना आधी त्या भागात गरम पाणी लावा. 2-3 मिनिटांनी केस नीट ओले झाल्यानंतर शेव्हींग करा. यानं जास्त त्रास होणार नाही.

4) शेव्हींग जेल – जर तुम्हाला इंफेक्शन टाळायचं असेल तर कोणत्याही शेव्हींग जेलचा वापर करणं योग्य राहिल.

5) प्रत्येक डायरेक्शन – अंडरआर्म्सचे केस हे कोणत्याही दिशेनं वाढलेले असतात. यासाठी प्रत्येक डायरेक्शनमध्ये रेजर फिरवून शेव्हींग करा. यानं क्लीन शेव्हींग होण्यास मदत होईल.

6) क्रिम किंवा तेल – तुम्ही शेव्हींग करताना अंडरआर्म्सला एखादं क्रिम किंवा तेल लावलं तर त्वचेत ओलावा राहिल आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही.