जलयुक्त शिवार योजना : वसंत मुंडे यांचे उपोषण मागे

पुणे / परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

परळी विधानसभा मतदारसंघात जलयुक्त शिवार योजनेत अंतर्गत कामांची तपासणी व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर आज दि.18 सप्टेंबर रोजी बसले व प्रताप सिंह कृषी आयुक्त, विजयकुमार इंगळे कृषी संचालक (नि.वगु नि.), कृषी उपसंचालक शितोळे यांच्या लेखी आदेशानुसार उपोषण मागे घेण्यात आले. असल्याची माहिती दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात मुंडेंनी दिली.

याबाबत दिलेल्या लेखी आदेशात म्हणटले आहे की, तालुक्यातील कृषी अधिकारी यांनी परळी वैजनाथ यांनी दक्षता पथकाने बीले/ देयके अदा करू नयेत अशा सुचना असतांना देयके दिली आहेत. तसेच तालुक्यातील गावे रामेवाडी, गाढेपिंपळगाव, पिंप्री बु., कौडगाव घोडा, कौडगाव हुडा, हिवरा, बोधेगाव, नाडपिंप्री, ममदापुर, सेलु सफदारबाद, कावळ्याचीवाडी, लोणी, इंजेगाव, नाथ्रा, रेवली वाका, अस्वलंबा, भोपळा, पांगरी, इत्यादी गावांची रँडम पध्दतीने तपासणी करुन कार्यवाही करण्याचे लेखी स्वरूपात जा.क्र./मृसं/ परळी वैजनाथ/ तक्रार अर्ज 2087/2018 मृद संधारण विभाग कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना दि.18/09/2018 ला करण्यासंदर्भात आदेशित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हा प्रभारी वसंत मुंडे व यांच्या सोबत गिताराम सोनवणे लोणी , बापुसाहेब जगताप खरवंडीकर, बबनराव पानसे पुणे, अशोक कोंडा, बालकिशन बासन्नर सोलापूर, सुभाष नाना निडाळकर, राजु कुलकर्णी, गोपाळ कुलकर्णी, पुणे परळीचे सय्यद अल्ताफ, सुनील माने हानुमंत माळी, प्रवीण गडकरी, पुणे सरकार निंबाळकर आदींनी उपोषण सुरु केले होते. या संदर्भात कृषी आयुक्त यांच्या लेखी आदेशानुसार उपोषण मागे घेण्यात आले. असल्याची माहिती ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97f058e8-bc1b-11e8-9dd8-d5928479c799′]