सांगली : पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया शांततेत

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्याबाहेरूनही बंदोबस्त मागवण्यात आला होता. गस्ती पथकांसह साध्या वेशातील पोलिसही प्रक्रियेवर वॉच ठेवून होते. त्यामुळे किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

पोलिसांशिवाय राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात करण्यात आली होती. मतदान केंद्रांवरील बंदोबस्ताशिवाय पोलिसांची विविध पथके तीनही शहरात गस्त घालत होते. सांगलीतील चिंतामणीनगर, गणेशनगर, सांगलीवाडी, मिरजेतील काही किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता तीनही शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

[amazon_link asins=’B01HROS4LI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’35fce472-959d-11e8-adf3-319fea6980a5′]

मतदानाच्या आधी तीन दिवसांपासून शहरातील सर्व बिअर बार, हॉटेल रात्री दहा वाजता बंद करण्यात येत होती. रविवारपासून पोलिसांनी पानपट्ट्याही बंद करायला लावल्या होत्या. शिवाय पोलिसांची नाकाबंदी, गस्त यामुळे रात्रीच्या गैरप्रकारांना चांगलाच आळा बसल्याचे दिसून आले. अधीक्षक शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी तीनही शहरात कडेकोट बंदोबस्त नेमल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सकाळी सातपासून पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे तीनही शहरात रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली जात होती. तीनही शहरातील बहुतांशी मतदान केंद्रांना शर्मा, बोराटे यांनी भेटी देऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.