‘रस्ता सुरक्षा अभियाना’अंतर्गत शहरात वाहतूक शाखेच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

29 व्या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत शहरात वाहतूक शाखेच्या वतीने विविध प्रकारचे प्रबोधखनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यामातून नागरिकांमध्ये, वाहन चालकांमध्ये व विद्यार्थ्यामध्ये वाहतूक जनजागृती व्हावी तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी आज दिनांक 30 एप्रिल रोजी पुणे शहरात पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, व पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे सह. पोलीस आयुक्त व वाहतूक विभागाचे विविध प्रभारी अधिकारी यांनी विविध कार्यक्रम राबविले.

कोंडवा वाहतूक विभागाने रस्ता सुरक्षा अभियान 2018 च्या निमित्ताने धर्मावत पेट्रोल पंप पिसोळी या ठिकाणी वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना स्टिकर वाटप करण्यात आले. तसेच खडकी वाहतूक विभागात सीअोईपी इंजिनिअरींग चाैकात महाविद्यालयाच्या विद्यार्थी व वाहतूक पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने वाहन चालकांना रस्ता सुरक्षा अभियान पंधरवाड्याच्या निमित्ताने प्रबोधनपर बॅनर दाखवून प्रबोधन केले.

हडपसर वाहतूक विभागाने रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने गाडीतळ भेकराईनगर येथील पीएमपीएमएल बस डेपो या ठिकाणी वाहन चालकांना वाहतूक नियमनाबद्दल प्रबोधन करण्यात आले. चिंचवड वाहतूक विभागाच्या वतीने नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तर पिंपरी वाहतूक विभागाने या अभियानात डाॅक्टर साैरभ चावरे यांच्या सहकार्याने पिपरी विभागात डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांच्या बद्दल जनजागृती निर्माण व्हावी तसेच त्यांना वाहन चालवीताना आपल्या जबाबदारीची जाणिव व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र अनेक वाहन चालक नियमांकडे दुर्लक्ष करत नियम पायदळी तुडवतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. वाहतूक विभागाच्या वतीने 25 एप्रिल ते 30 एप्रिल 2018 या कालावधीत विविध विभागात रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने दंडात्मक कारवाई करण्यात आली.यामध्ये विना हेल्मेट गाडी चालवणे 5947, ट्रिपलसीट 796, तर मोबाईल टाॅकिंगच्या 1189 केसेस करण्यात आल्या. या केसेसच्या माध्यमातून 33 लाख 70 हजार 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अशी करण्यात आली दडात्मक कारवाई

गुन्ह्याचा प्रकार – कारवाईची संख्या – दंडाची रक्कम

हेल्मेट –             5947    – 29,73500

ट्रिपलसीट-         796      – 1,59200
मोबाईल टाॅकिंग1189    – 2,37800