संशयित समजून पोलिसांनी अ‍ॅपलच्या एरिया मॅनेजरलाच  घातली गोळी

लखनौ : पोलीसनामा ऑनलाईन 

उत्तर प्रदेश पोलिसांच्या एनकाऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशाची राजधानी असलेल्या लखनौमधील गोमतीनगर परिसरात पोलिसांनी संशयित समजून एका युवकावरच गोळी झाडल्याचे समोर आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d1356c0-c3b4-11e8-a87e-73c7f9da0d5c’]

विवेक तिवारी असे या तरुणाचे नाव असून तो अ‍ॅपल कंपनीचा एरिया मॅनेजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदनात त्याच्या डोक्यात गोळी लागल्याने मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विवेक याचा उपचारादरम्यान मध्यरात्री बारा वाजता मृत्यू झाला. कार चालवणारा हा तरुण संशयित वाटत होता, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोळी घातली,असा दावा पोलिसांनी केला आहे.

औरंगाबादमध्ये हर्षवर्धन जाधव विरुद्ध चंद्रकांत खैरे ‘सामना’ रंगणार

लखनौमधील गोमतीनगर परिसरात एक कार उभी असताना समोरुन दोन पोलीस कर्मचारी येत होते. पोलिसांना पाहताच ही कार निघून जात होती. पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यातच गोळी चालल्याचा आवाज आला. अचानक गाडी एका खांबावर आदळली. विवेक त्यानंतर रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले. पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू गोळी लागल्याने झाला की गाडी खांबावर आदळल्याने याचा तपास सुरु आहे, अशी माहिती लखनौचे एसएसपी कलानिधी नैथानी यांनी दिली.सुलतानपूर इथे राहणारा विवेक हा तरुण अ‍ॅपल कंपनीच्या एरिया मॅनेजर या पदावर काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली आहेत.

पोलीस कर्मचाऱ्याने गोळी मारल्याची घटनेची ही महिला सहकारी प्रत्यक्षदर्शी आहे. तिला पोलिसांनी गोमतीनगरमधील तिच्या घरीच नजरकैदेत ठेवले आहे, जेणेकरुन तिला मीडियाशी बोलता येणार नाही. गोळीबाराची घटना घडली तेव्हा ती विवेकसोबत कारमध्ये होती. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.  दरम्यान, शवविच्छेदनात विवेक याच्या डोक्यात गोळी लागल्याने मृत्यु झाल्याचे निदान करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B07BCGC13F,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2c06575a-c3b5-11e8-9798-a32d513d4525′]