अंडरवर्ल्ड डॉनचा साथीदार आमचाच नागरिक : पाकिस्तान 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
थायलँडच्या एका कोर्टात भारताचा कुख्यात डॉनचा हस्तक मुदस्सर हुसैन उर्फ मुन्ना झिंगाडा हा भारताचा नसून पाकिस्तानचा नागरिक आहे. असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही महिन्यांपूर्वीच मुन्ना झिंगाडाला भारताच्या ताब्यात देण्याचा आदेश याच कोर्टाने दिला होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4b87f552-c92e-11e8-8f10-4bf4c74de7cc’]

मुन्ना झिंगाडाने थायलँडमध्ये १८ वर्षांपूर्वी छोटा राजनवर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यासाठी मुन्नाला थायलँड कोर्टाने १२ वर्षांची शिक्षाही सुनावली होती. मात्र २०१२ मध्ये मुन्ना ह्या शिक्षेतून मुक्त झाला. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोघीनींही मुन्ना झिंगाडा आमच्या देशाचा नागरिक असल्याचा दावा केला होता.
परंतु थायलँडसमोर मुन्ना झिंगाडाला कोणत्या देशाच्या ताब्यात द्यायचे असा प्रश्न उभा राहिला होता. मात्र हा खटला पुन्हा थायलँडच्या कोर्टात गेला. यासंदर्भात काही महिन्यांपूर्वीच थायलँड कोर्टाने मुन्ना झिंगाडाला भारताचा भारताचा नागरिक असल्याचे मान्य केले. आणि त्याला भारताच्या ताब्यात द्यायचे आदेशही  दिले होते. मात्र यादरम्यान पाकिस्तानने  कोर्टाच्या या फैसल्याविरूद्ध थायलँड कोर्टात  फेरविचार याचिका दाखल केली आहे.

मेट्रो मार्गिकेच्या परिसरात चार एफएसआय बांधकाम परवानी देण्यास स्वंयसेवी संस्थांचा विरोध

मुन्ना झिंगाडा हा केवळ छोटा शकीलचाच नाही तर अंडरवल्ड डॉन दाऊदी ब्राहीमचाही हस्तक होता. त्याला पाकिस्तान मधील दाऊदचे सर्व ठिकाण माहित असून त्याला त्या संदर्भात सर्व माहिती आहे. आणि तो जर भारताच्या ताब्यात गेला तर. त्याच्या मदतीने भारत पाकिस्तानवर दबाव निर्माण करत दाऊदला अटक करू शकतो. यामुळे  पाकिस्तानला मुन्ना झिंगाडाचा ताबा हवा आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानने मुन्ना झिंगाडाच्या नागरिकत्वाची खोटी कागदपत्रेही तयार केली असल्याची माहिती सूत्रांन मार्फत मिळाली आहे.  यामुळेच पाकिस्तान जंग पछाडतं असल्याचे दिसून येत आहे.

[amazon_link asins=’B0757K3MSX,B0748NPV86′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1f665b9-c92e-11e8-9282-4f4ed578d18d’]