W-19 : ‘वर्ल्डकप’ जिंकणार्‍या बांगलादेशी खेळाडूंचे ‘गलिच्छ’ वर्तन ! भारतीय क्रिकेटर्संना कॅमेर्‍यासमोर घातल्या ‘शिव्या’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत- बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात बांगलादेशने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली. बांगलादेशने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकत सगळ्यांना चकित केले. मात्र काही वेळानंतर दोन्ही संघामध्ये शाब्दिक चकमक झाली. बांगलादेश ने सामना जिकल्या नंतर त्यांच्या खेळाडूंनी धक्काबुक्की करत भारतीय खेळाडूला शिव्या दिल्या. हे सगळे घडल्या नंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अली नेही माफी मागितली. आयसीसीने संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले आहे, असे सांगण्यात येत आहे.

खेळाडूंनी मर्यादा ओलांडल्या
भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गने असे मत व्यक्त केले आहे कि, सामन्यानंतर बांगलादेशी खेळाडू खूप वाईट वागले. सामन्याच्या दुसऱ्या षटकात तन्झिम हसन साकीबच्या थ्रोवर दिव्यंश सक्सेना थोडक्यात बचावला. सक्सेनाच्या डोक्यावर शाकिबने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. बांगलादेशचे गोलंदाज भारतीय फलंदाज बाद झाल्यावर विचित्र इशारे करत होते.

कॅमेर्‍यासमोर गैरवर्तन
बांगलादेश विजयाच्या जवळ आल्यानंतरही इस्लाम कॅमेर्‍यासमोर शिव्या घालताना दिसला. बांगलादेशचे खेळाडू खूपच आक्रमकता दाखवत प्रत्येक चेंडूनंतर भारतीय फलंदाजाला सतत काहीतरी सांगत असत.

बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने माफी मागितली
बांगलादेश चा कर्णधार अकबर अलीने आपल्या खेळाडूंच्या अश्या वागण्यावर माफी मागितली .जे घडलं ते चुकीचे होत . सामन्यानंतर पत्रकार परिषदेत अकबर ने वयापेक्षा अधिक परिपक्वता दाखवताना, आमचे काही गोलंदाज अधिक उत्साही झाले. सामन्यानंतर जे घडलं ते चुकीचे आहे . मी भारताचे अभिनंदन करू इच्छितो , असं तो म्हणाला.

टीम इंडियाचा अंतिम सामन्यात असा झाला पराभव ..
भारतीय संघाचे अंडर १९ वर्ल्ड कपच्या विश्वविजेतेपदाचे स्वप्न पाचव्यांदा मोडले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 177 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाने डकवर्थ लुईस नियमांच्या आधारे हा सामना ३ गडी राखून जिंकला. पावसामुळे सामन्याच्या शेवटी बांगलादेशला विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य गाठावे लागले. पण त्यांनी ते ४२ . १ षटकात लावले . बांगलादेशचा संघ प्रथमच विश्वविजेता झाला.