Under2 Coalition | महाराष्ट्राला मिळाला जागतिक पुरस्कार, पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी कौतुक होणारे देशातील पहिले राज्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वातावरण कृतीसाठी अंडर 2 कोएलिशनकडून (Under2 Coalition) महाराष्ट्राला प्रादेशिक नेतृत्वाचा जागतिक पुरस्कार (World Awards) मिळाला आहे. स्कॉटलंडमधील (Scotland) अंडर 2 कोएलिशनच्या (Under2 Coalition) तीन पुरस्कारापैकी एक पुरस्कार मिळवणारं देशातील एकमेव राज्य महाराष्ट्र (Maharashtra) ठरलं आहे. वातावरण संरक्षणासाठी राज्यस्तरावर केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्कॉटलंडमध्ये हा पुरस्कार स्विकारला आहे. हा पुरस्कार स्वीकारणारे ते जगातले सर्वात तरुण पर्यावरण मंत्री ठरले आहेत.

वातावरण कृतीसाठी कटिबद्ध अशा अनेक राज्ये आणि प्रदेशांचे सर्वात मोठे जाणे असलेल्या अंडर 2 कोएलिशनच्या (Under2 Coalition) नेतृत्व पुरस्कार सोहळ्यातील पहिला प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्वाचा पुरस्कार महाराष्ट्राने पटकवला आहे. COP 26 सिमिटसोबतच ग्लासगोमध्ये हा सोहळा पार पडला.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, कोणत्याही भौगोलिक, वांशिक, राष्ट्रीय किंवा लिंगभेद अशा सीमा न पाहता
या जागतिक संकटासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न आणि अर्थपूर्ण कृती करणे ही तातडीची गरज  आहे अशी आमची धारणा आहे. आम्ही मनापासून करत असलेल्या वातावरण कृतींची अंडर 2 कोएलिशनने दखल घेतली त्यासाठी आम्हाला आनंद झाला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ST Workers Agitation | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी

टीम महाराष्ट्राने अंडर 2 कोएलिशन मध्ये प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व क्रिएटिव्ह सोल्यूशन्स (Creative Solutions) आणि क्लायमेट पार्टनरशिप्स (Climate Partnerships) अशा सर्व विभागात प्रवेशिका पाठविल्या होत्या.
अंडर 2 हा विविध राज्ये आणि प्रदेशांच्या नेतृत्वांचा समूह वातावरण कृतीसाठी प्रतिबद्ध असून अंडर 2 कोएलिशनमध्ये जगभरातील 260 सदस्य आहेत. 260 राज्य सरकारांमध्ये भारतातील चार राज्ये साहभागी आहेत.

भारतातील सर्वाधिक औद्योगिकरण झालेल्या आणि 720 किमीची संवेदनशील कीनारपट्टी असलेल्या महाराष्ट्राने आपल्या नामांकनामध्ये थोडक्या वेळात राज्याने केलेल्या प्रयत्नांची विस्तृत माहिती दिली.
धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेत वातावरण सक्षमतेचा समावेश करण्याची गरज राज्याने ओळखली
आणि नवे प्रकल्प सुरु केले, तसेच शाश्वत विकासाला प्राधान्य देत कायस्वरुपी बदल होईल अशी धोरणे आणि उपक्रमातून ते दिसले, या बाबी अधोरेखित केल्या.

राज्य सरकार महाराष्ट्रात वातावरण कृती संस्कृती तयार करण्यात यशस्वी झाल्याची बाबत ठळकपणे मांडण्यात आली.
याच राज्याने गेल्या वर्षी वातावरणसंबंधी आपत्तीमुळे 2 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च केला आहे.

हे देखील वाचा

Ahmednagar Hospital Fire | ठाकरे सरकारकडून अहमदनगर जिल्हा रुग्णालय ‘आग’ प्रकरणी कठोर कारवाई ! सिव्हिल सर्जन डॉ. पोखरणा यांच्यासह 2 डॉक्टर, 3 नर्सचा समावेश

Jilha Nivad Samiti Jalna Recruitment | जिल्हा निवड समिती जालना इथे थेट मुलाखतीद्वारे भरती; जाणून घ्या सविस्तर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Under2 Coalition | maharashtra awarded best leadership in climate change efforts under2 coalition scotland aditya thackeray receives

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update