अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणप्रकरणी महिला अटकेत

पोलीसनामा ऑनलाइन : येथील पोलिसांनी बुधवारी एका २४ वर्षीय महिलेला अटक केली. तिच्यावर अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या घटनेची तक्रार पीडित मुलाच्या आईने केली. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपीविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

दरम्यान, पीडित मुलगा १६ वर्षांंचा आहे. २४ वर्षीय आरोपी महिला सप्टेंबरपासून या मुलाच्या घरी भाडय़ाने राहत होती. नोव्हेंबरच्या सुरवातीला तिने त्यांची खोली सोडली. यादरम्यान सुमारे चार ते पाच वेळा या महिलेनं मुलाचं लैंगिक शोषण केलं . ती ओशिवरा परिसरात एका शॉपिंग सेंटरमध्ये कामाला आहे. तिला तीन वर्षांंचे मूल आहे. ही माहिती मुलाच्या आईला त्याच्या मित्रांकडून मिळाली. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र तक्रार दाखल केल्याचं समजताच ही महिला मालाड येथील राहत्या घरातून फरार झाली. याबाबत तांत्रिक तपासाच्या साहाय्यानं गोरेगाव पोलिसांनी तिचा पत्ता शोधून काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.