पदवीधरांसाठी खुशखबर ! मोदी सरकार देणार मंत्रालयात ‘इंटर्नशीप’ची संधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील प्रतिष्ठीत संस्थांमधून अंडर ग्रॅजुएट / ग्रॅजुएट / पोस्ट ग्रॅजुएट डिग्री किंवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिनिस्टरी ऑफ न्यू अ‍ॅण्ड रिन्युएबल एनर्जी कडून इंटर्नशिप सुरु करण्यात येणार आहे. ही इंटर्नशिप भारतीय नागरिकांबरोबर परदेशात राहणारे भारतीय नागरिक करु शकतात. इंजिनिअरिंग, विज्ञान, प्रबंधन, कायदा आणि इतर क्षेत्रातील विद्यार्थी ही इंटर्नशिप करु शकतात.

दोन ते सहा महिने करता येणार इंटर्नशिप
इंटर्नशीप अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑफ न्यू अ‍ॅण्ड रिन्युएबल एनर्जीमध्ये शोध, प्रबंध तसेच इतर गोष्टीसंबंधित प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांना मिनिस्टरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळेल. मंत्रालयाची ही इंटर्नशिप दोन ते सहा महिन्यांची असेल. ही इंटर्नशिप अनपेड बेसिस वर करण्यात येईल. जेथे कोणत्याही प्रकारचे वेतन रक्कम देण्यात येणार नाही. प्लेसमेंटची देखील कोणतीही गॅरंटी नसेल.

इंटर्नशिप संबंधित माहिती –
योजनेचे नाव – नॅशनल रिन्युएबल एनर्जी इंटर्नशिप (NREI) स्कीम

हे विद्यार्थी करु शकतात अर्ज
या इंटर्नशिपसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची पदवी आवश्यक आहे, यासाठी इंजिनिअरिंग/ मॅनेजमेंट / लाॅ / सायन्स मधील ग्रॅजुएट, अंडर ग्रॅजुएट, पोस्ट ग्रॅजुएट विद्यार्थी अर्ज करु शकतात. परदेशी भारतीय विद्यार्थ्यांना देखील इंटर्नशिपची संधी आहे.

उद्देश्य
या इंटर्नशिप करण्याचा मागे मंत्रालयाचा उद्देश्य विद्यार्थ्यांना मंत्रालयातील कामकाजाबाबत, कार्यक्रम आणि धोरणाबाबत, नवीकरणीय ऊर्जेचे मुद्दे आणि विश्लेषण, तंत्रिक रिपोर्ट, प्रौद्योगिकी उन्नती परियोजना, नीति बनवण्यासाठी योगदानबाबत माहिती देणे.

एकावेळी 40 विद्यार्थी करु शकतात इंटर्नशिप
या योजनेंतर्गत एका वर्षात जास्तीत जास्त 40 विद्यार्थी इंटर्नशिप करु शकतात. परंतू कोणत्याही कारणाने विद्यार्थ्याने मध्येच इंटर्नशिप सोडली तर त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही.

असा करा अर्ज
इच्छुक विद्यार्थी मिनिस्टरी ऑफ न्यू अ‍ॅण्ड रिन्युएबल एनर्जीच्या ऑफिशिअल वेबसाइटवर www.mnre.gov.in.intern वर जाऊन अर्ज करु शकतात.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like